तसे तर आजच्या काळामध्ये प्रत्येकजण फक्त पैशाच्या मागे धावत आहे. पण ते म्हणतात ना निरोगी जीवन मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. वास्तविक हि म्हण लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला एक साधारण उपाय सांगणार आहोत जो आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. या उपायानुसार तुम्हाला तुमच्या जिभेने टाळूला स्पर्श करायचा आहे आणि नंतर श्वास घ्यायचा आहे.

ज्या लोकांना रात्री झोप येत नाही, त्यांच्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी सिद्ध होईल. तथापि अशाप्रकारे श्वास घेतल्याने थोडे विचित्र वाटेल पण नक्कीच असा व्यायाम तुम्हाला कुठेच मिळणार नाही. याचा प्रभाव सरळ आपल्या आरोग्यावर पडेल. चला तर आता आपण जाणून घेऊया हे कसे करायचे आहे. सर्वात पहिला आपल्या जिभेच्या टोकाने आपल्या टाळूला स्पर्श करा आणि असेच श्वास घ्या. यानंतर चांगल्याप्रकारे आपल्या फुफ्फुसांचा श्वास बाहेर काढा.

नंतर आपल्या नाकाने श्वास घ्या चार पर्यंत मोजा. यानंतर आपला श्वास रोखा आणि सात पर्यंत मोजा. नंतर एक लांब श्वास घ्या आणि आपले तोंड देखील श्वासाने फुगवा. यानंतर आठ पर्यंत मोजून तोंडातून शिटीची आवाज काढा. हि प्रक्रिया चार वेळा करा. जर हि प्रक्रिया रोज दोन किंवा तीन वेळा सतत केल्यास शारीरक क्रिया बदललेली पाहायला मिळेल.

हि प्रक्रिया केल्याने पाचनतंत्र चांगले होते आणि हृदयाचे ठोके कमी करते. यासोबत आपले रक्तदाब देखील कमी करते. जर तुम्हाला रात्री झोपण्यास त्रास होत असेल तर हि पद्धत जरूर वापरून पहा. याशिवाय हा व्यायाम केल्यास आपल्याला इतर औषधांची गरज भासणार नाही.

याशिवाय हि पद्धत तणाव दूर करण्यासाठी आणि आराम देण्यास मदत करते. त्याचबरोबर हा एकदम सोपा उपाय आपल्या तांत्रिक प्रणालीस नैसर्गिक मार्गाने बरे करण्यास देखील मदत करते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने