तीळ आपल्या सर्वांच्या शरीरावर असते. एखादे तीळ जन्मापासूनच असते तर एखादे नंतर येते. अनेक वेळा तीळ आपल्या शरीरावरून गायब देखील होते. समुद्र शास्त्रानुसार व्यक्तीचे तीळ त्याच्या लाईफबद्दल बरेच काही सांगते. हे तीळ शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे असू शकते. हे या गोष्टीवर अवलंबून असते कि तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे. प्रत्येक तिळाचे एक वेगळे महत्व असते. चला तर जाणून घेऊया आपल्या शरीरावरील तीळ काय सांगते.

नाकावर तीळ: ज्या एखाद्या व्यक्तीच्या नाकावर तीळ असेल तर याचा अर्थ असा होतो कि तो प्रतिभेचा धनी आहे. त्यांच्यामध्ये प्रतिभा ठासून भरली आहे. तो आपल्या प्रतिभेच्या बळावर काहीही मिळवू शकतो. अशी व्यक्ती आयुष्यामध्ये सुखी राहते. तर महिलांच्या नाकावर तीळ असण्याचा असा अर्थ होतो कि ती सौभाग्यशाली आहे. तिला आपल्या नशिबाच्या बळावर सर्वकाही मिळते.

अनामिका बोटावर तीळ: ज्या लोकांच्या हाताच्या अनामिका बोटावर तीळ असते त्यांना आयुष्यामध्ये धनाची कमी कधीच जाणवत नाही. असे लोक जीवनामध्ये धन आणि यश दोन्ही प्राप्त करतात. तर तीळ सर्व छोट्या बोटावर असेल तर ती व्यक्ती यशस्वी होते. याशिवाय ज्यांच्या हाताच्या मधोमध तीळ असते ते देखील भाग्यवान असतात.

ओठावर तीळ: ज्या महिलांच्या ओठावर तीळ असते त्या स्वभावाने खूप का’मु’क असतात. त्यांना जीवनामध्ये खूप भो’ग-वि’ला’स मिळतो. अशा महिला खूपच चतुर देखील असतात. त्या चलाख असतात. लोक या महिलांचे दिवाने होतात.

माथ्यावर तीळ: जर एखाद्या महिलेच्या माथ्यावर तीळ असेल तर तिच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता नसते. अशा महिला स्वतःच्या बळावर जीवनामध्ये सफलता मिळवतात. जर महिलेच्या माथ्यावर उजव्या बाजूला तीळ असेल तर तिला जीवनामध्ये खूप पैसा मिळतो. ती धन कमवण्यामध्ये हुशार असते.

अंगठ्यावर तीळ: जर एखाद्या मुलीच्या अंगठ्यावर तीळ असेल तर ती स्वभावाने खूपच शांत आणि न्यायप्रिय असते. या मुली खूप मेहनती असतात आणि आपल्या कामावर विश्वास ठेवतात. अशा मुलींना नशिबावर अवलंबून राहणे आवडत नाही.

उजव्या गालावर तीळ: जर एखाद्या महिलेच्या उजव्या गालावर तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन सफल आणि सुखी होते. तर डाव्या गालावर तीळ असेल तर याचा अर्थ असा होतो कि तिला जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने