बहुतेक मुली तथा महिला आपल्या ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी लिपस्टिकचा प्रयोग करतात. पण कदाचित तुम्हाला हे माहिती नाही कि या वस्तूंच्या वापराने ओठांचा काळेपणा दूर होत नाही तर ओठ आणखीनच कुरूप आणि वाईट दिसू लागतात.

या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे फक्त फाटलेल्या ओठांपासून सुटका होणार नाही तर तुमचे ओठ बॉलीवूडच्या अभिनेत्रीप्रमाणे एकदम गुलाबी दिसू लागतील. चला तर जाणून घेऊया हे सोपे उपाय.

ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी करण्यासाठी दुध आणि मलईचा वापर करणे खूपच लाभदायक असते दुधाची मलई दोन प्रकारची असते. एक जी दुध गरम केल्यानंतर येते आणि दुसरी जी गरम दुध थंड केल्यानंतर येते.

हा उपाय करण्यासाठी दुसऱ्या मलईचा वापर करायचा आहे. दुधाला फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यावर आलेली मलई बोटाने काढून घ्या आणि ओठांना लावा. याला १०-२० मिनिटे असेच लावून ठेवा आणि थोड्या वेळानंतर ओठांना पाण्याने धुवून घ्या.

हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल कि दुध आणि केळे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक असते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि केळासोबत केळीच्या सालीमध्ये अनेक गुणधर्म असतात. जर तुम्ही केळीच्या आतमधल्या भागाने ओठांना मसाज केलात तर खूपच लवकर तुमचे काळे ओठ गुलाबी होतील.

बारीक साखर घेऊन ती थोडी ओली करा आणि त्याला चांगल्याप्रकारे आपल्या ओठांवर रगडा. असे केल्याने काही दिवसांमध्ये तुमचे काळे ओठ गुलाबी दिसू लागतील. हे घरगुती उपाय केल्यास तुम्हाला काही दिवसांमध्ये परिणाम दिसू लागेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने