तुम्ही अनेकदा पाहिले असेल कि कधी कधी पायावर किंवा हातावर कोळीच्या जाळ्याच्या आकाराच्या निळ्या रंगाच्या नसा वर आलेल्या दिसतात. कधी कधी या नसा पायापेक्षा मांडीवर जास्त पाहायला मिळतात. कधी कधी या नसा पायावर किंवा मांडीवर खूप मोठ्या आकाराच्या होतात.

कधी कधी तुम्ही पाहिले असेल कि कुटुंबातील सदस्यांच्या हातावर निळ्या रंगाच्या नसा मोठ्या प्रमाणात पसरलेल्या दिसतात आणि त्याचबरोबर कधी कधी सूज देखील येते. कधी तुम्ही काही लोकांमध्ये विशेष करून छातीच्या वरच्या भागामध्ये आणि गळ्याच्या खालच्या भागावर अशाप्रकारच्या नसा पसरलेल्या दिसतात.

या विलक्षण पद्धतीने दिसणाऱ्या त्वचेवरील नसा शरीरामधील विभिन्न रोगांकडे इशारा करतात. शरीराच्या कोणत्याही भागावर अशाप्रकारच्या नसा असतील तर याला गंभीरतेने घ्यावे आणि ताबडतोब व्हॅस्क्यूलर सर्जनचा सल्ला अवश्य घ्यावा.

का दिसतात अशा नसा: या वर आलेल्या नसा शरीराच्या वरच्या भागावर स्थित नसाचे एक जाळे आहे. जे सामान्य परिस्थितीमध्ये त्वचेवर जास्त फुगत नाहीत आणि शरीराच्या आतमध्ये स्थित मोठ मोठ्या नसांचा सिस्टमसोबत जोडलेल्या राहतात. वरच्या भागामध्ये स्थित नसांचे जाळे वरच्या भागामधील अशुद्ध रक्त एकत्र करून शरीराच्या खोल भागामध्ये स्थित मोठ्या नसांच्या सिस्टममध्ये पोहोचवतात. जेथून सर्व अशुध्द रक्त एकत्र होऊन हृदयाद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचते.

जर एखाद्या कारणामुळे शरीराच्या आतमध्ये मोठ्या नसांच्या सिस्टममध्ये अडथळा येतो तेव्हा बाहेरच्या भागामधून येणारे रक्त स्वीकार करू शकत नाही ज्यामुळे अशुद्ध रक्त आतमध्ये न जाता त्वचेच्या आतल्या भागामध्ये साठून राहते ज्यामुळे त्वचेच्या खाली स्थित शिरांच्या सिस्टममध्ये अशुद्ध रक्ताचे प्रमाण जास्त झाल्याने या निळ्या नसा वर येऊन मोठ्या दिसू लागतात.

वर आलेल्या नसांचे कारण: जर तुमच्या शरीरामध्ये हातावर किंवा पायावर निळ्या नसा अचानक दिसू लागल्या आणि हे सारखे होत असल्यास याचे कारण अशुद्ध रक्त एकत्र करणाऱ्या नसेमध्ये रक्त जमा होत आहे किंवा मान किंवा खांद्यावर स्थित एखादा ट्यूमर किंवा कँसरची गाठ त्यावर बाहेरून दबाव टाकत आहे. कधी कधी मान किंवा खांद्यावर स्थित कँसरची गाठ शेकताना देखील सुजेसोबत निळ्या नसा उद्भवण्याची शक्यता असू शकते.

वर आलेल्या नसा दिसणे: जर तुमच्या मांडीवर कोळीच्या जाळ्याप्रमाणे निळ्या नसा वर आलेल्या दिसत असतील तर याला सामान्य समजू नये. याला एखाद्या व्हॅस्क्यूलर किंवा कार्डियो व्हॅस्क्यूलर सर्जनला दाखवून त्यांचा सल्ला अवश्य घ्या. अशाप्रकारच्या वर आलेल्या नसांचे दोन कारण असू शकते. एक कारण क्रोनिक वीनस इन्सफीशियन्सी ज्यामध्ये आतमधले दरवाजे कमजोर पडतात.

सामान्यत: या नसांमध्ये स्थित दरवाजे एकाच दिशेमध्ये वर चढण्यास अनुमती देतात ज्यामुळे मांड्यांमध्ये अशुद्ध रक्त जास्त प्रमाणात एकत्र होऊ शकत नाही. वर आलेले रक्त जर परत येण्याचा प्रयत्न करत असेल तर हे दरवाजे बंद होतात ज्यामुळे रक्त परत येऊ शकत नाही. जेव्हा हे दरवाजे एखाद्या कारणामुळे बंद होतात तेव्हा यांचा संरचनेमध्ये एखादे गंभीर परिवर्तन होतात तर वर जाणाऱ्या रक्ताचा जास्त भाग या दरवाजांच्या कमजोर होण्याने वरच्या दिशेला जाऊन पुन्हा खालच्या येतो. हि पुन्हा परत येण्याची क्रिया सतत झाल्याने अशुद्ध रक्त त्वचेच्या खाली स्थित नसांमध्ये साठायला सुरुवात होते ज्यामुळे त्वचेवर निळ्या नसा दिसू लागतात.

हे नसांमध्ये स्थित दरवाजे लोकांमध्ये दररोज न चालणे, व्यायामाच्या अभावाने कमजोर पडतात आणि आपले कार्य चांगल्या प्रकारे करू शकत नाहीत. दरवाजांच्या संरचनेमध्ये परिवर्तन नसांमध्ये रक्ताचे काही भाग काही काळासाठी एकत्र राहिल्याने आंशिक रूपाने नष्ट होतात ज्यामुळे ते आपसात चांगल्या प्रकारे बंद होऊ शकत नाहीत ज्यामुळे वर चढलेले अशुद्ध रक्त खाली येण्यास सुरवात होते आणि त्वचे खाली वर आलेल्या नसांमध्ये दिसू लागते.

अॅप्पल साईडर व्हिनेगर: याशिवाय अॅप्पल साईडर व्हिनेगर यामध्ये बर्याधच प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. अॅप्पल साईडर व्हिनेगरने हलकी हलकी मालिश करावी आणि दोन चमचे पाण्यामध्ये टाकून घ्यावे. अॅसिडिटीच्या रुग्णांनी अॅप्पल साईडर व्हिनेगरचा वापर करू नये. जर आवश्यक भासल्यास अॅसिडिटीची औषधे सोबत घ्यावीत.

मुळीचा रस: तिखट मुळाचा रस काढून त्यामध्ये पीठ भिजवून त्याची भाकरी बनवा. भाकरी मोठी असावी. नंतर ती भाकरी आणि मुळाचा रस एकत्र करून चुरमा करून घ्या आणि ते नसांवर बांधून रात्रभर ठेवा आणि सकाळी ते काढून टाका. असे एक महिना केल्याने खूप लाभ मिळतो. थोडी खाज असेल तर समजून जा कि तुमचा रोग बरा होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने