आजच्या काळामध्ये केसांची समस्या सामान्य झाली आहे. कोणाचे केस अकाली गळत आहेत तर कोणाचे केस पातळ होत आहेत आणि पांढरे होत आहेत. या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक महागडे प्रोडक्ट वापरतात पण तरी देखील त्याचा काहीच फायदा मिळत नाही. पण आज आम्ही तुम्हाला केसांच्या समस्येचा एक सोपा उपाय सांगणार आहोत. केसांना ठीक करण्याचे हे औषध आपल्या किचनमध्येच उपलब्ध असते.

कांद्यामध्ये लपलेले आहेत केसांना निरोगी बनवण्याचे अनेक गुणधर्म: लोक कांद्याचा उपयोग फक्त अन्नाची चव वाढवण्यासाठी आणि सॅलेड म्हणून करतात. पण याचा वापर केसांना निरोगी बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. कांद्यामध्ये केसांना मजबूत आणि दाट करण्यासाठी अनेक गुणधर्म असतात.

कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांना मजबूत बनवण्याचे काम करते तर यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म खराब स्केल्प साफ करून हेल्दी बनवण्याचे काम करते. चला तर याची वापर करण्याची विधी आपण जाणून घेऊया.

कांद्याचा वापर अशाप्रकारे करा: सर्वात पहिला २-३ कांदे घ्या आणि ते चांगले सोलून कापून घ्या. आता हे मिक्सरमध्ये चांगले बारीक करून याची पेस्ट बनवून घ्या. हि पेस्ट कपड्याच्या सहाय्याने गाळून याचा रस काढून घ्या. हा कांद्याचा रस केसांना हलक्या प्रकारे चांगल्या प्रकारे लावा. कांद्याचा रस जवळ जवळ ४५ मिनिटे केसावर तसाच राहू द्यावा. यानंतर शैम्पूने आपले डोके धुवून घ्या. हा प्रयोग आठवड्यामधून दोन वेळा केल्याने केस गळती थांबते आणि त्याचबरोबर केस दाट आणि मुलायम होतात.

एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये एक मोठा चमचा कांद्याचा रस मिसळा. या मिश्रणाने शैम्पू केल्यानंतर केस चांगले धुवून घ्या. जर तुम्हाला कांद्याच्या वासाने त्रास होत असेल तर जवळ जवळ दोन तासानंतर पुन्हा केसांना शैम्पू करू शकता. चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला हा प्रयोग आठवड्यामधून दोन वेळा करायला हवा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने