वास्तूशास्त्रामध्ये घराच्या मुख्य द्वाराबद्दल खूप टिप्स सांगितल्या गेल्या आहेत. कारण आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक निगेटिव्ह आणि पॉजीटिव्ह एनर्जी येथून येते म्हणून प्रत्येकाची इच्छा असते कि त्याच्या घराच्या मुख्य द्वारापाशी कोणताही वास्तुदोष होऊ नये. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. पण खूप लोकांना माहिती नाही कि मुख्य द्वारासोबत घराच्या उंबरठ्यासंबंधी देखील काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

वास्तविक असे म्हंटले जाते कि घराच्या उंबरठ्यावर काही कार्य करण्यास वर्जित मानले जाते. जो व्यक्ती हे कार्य करतो त्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वास्तू शास्त्रा नुसार दाराच्या चौकटीच्या खालच्या भागाला सामान्यतः उंबरठा म्हंटले जाते. वास्तू शास्त्रामध्ये याला खूपच जास्त महत्व दिले गेले आहे.

वास्तू शास्त्रानुसार घराचा उंबरठा तुटलेला किंवा खंडित नसावा. त्याचबरोबर उंबरठा चांगल्या प्रकारे बनवला गेला नसेल तर ते देखील चांगले मानले जात नाही. याशिवाय उंबरठा मजबूत आणि सुंदर असणे जरुरीचे आहे. ज्या ठिकाणी उंबरठा नसतो तिथे वास्तू दोष उत्पन्न होतात. वास्तूशास्त्रानुसार जो देखील व्यक्ती घरामध्ये प्रवेश करतो त्याने उंबरठा ओलांडूनच आत यावे.

उंबरठ्यावर करू नयेत हि कामे: खास करून हे लक्षात ठेवा कि उंबरठ्यावर कधीच उभे राहू नये त्याचबरोबर यावर कधी पाय आपटू नये. याशिवाय उंबरठ्यावर कधीच घाण पाय आणि चप्पल रगडून साफ करू नये.

अनेक वेळा असे पाहिले जाते कि लोक घरामध्ये प्रवेश करताना उंबरठ्यावर उभे राहून मोठ्यांचे चरण स्पर्श करतात ज्याला वास्तू शास्त्रामध्ये चांगले मानले गेले नाही. लोक नेहमी उंबरठ्यावर उभे राहून पाहुण्यांचे स्वागत करतात किंवा त्यांना निरोप देतात. हे लक्षात ठेवा कि नेहमी उंबरठ्याच्या आतमधून आणि निरोप उंबरठ्याच्या बाहेर उभे राहून दिला पाहिजे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने