तरुण मुला-मुलींसाठी चेहऱ्यावरील मुरूम एक मोठी समस्या आहे. लोक याला लवकरात लवकर चेहऱ्यावरून हटवण्यासाठी त्याला फोडायला सुरुवात करतात. पण असे करणे एकदम चुकीचे आहे. यामुळे तुमची समस्या आणखीनच वाढते. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण चेहऱ्यावरील मुरूम फोडणे चांगले वाटते. पण लोकांना हे माहिती नसते कि यामुळे चेहऱ्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

चेहऱ्यावरील डाग: डाग आपल्याला लगीच दिसत नाहीत दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसानंतर मुरूमाच्या ठिकाणी ते दिसू लागतात. बहुतेक लोक मुरूम फोडण्यासाठी नखे किंवा प्लकर वापरतात जे चेहऱ्याच्या सॉफ्ट स्किनसाठी हार्श असते आणि आसपास डाग दिसू लागतात जे सहजपणे जात नाहीत.

मुरूम पुन्हा येणे: जर तुम्हाला वाटत असेल कि मुरूम फोडल्यानंतर त्यापासून मुक्ती मिळते तर हे चुकीचे आहे. जर तुम्ही मुरूम वेळेअगोदर फोडता तर त्यामधून निघालेली घाण आसपास पसरते आणि त्यामुळे बाकी स्कीनला देखील नुकसान पोहोचते. यामुळे तुम्ही पाहिले असेल कि मुरूम फोडल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा मुरूम येतात किंवा त्याबाजूला देखील येतात.

स्कीन वर आलेली दिसते: मुरूम फोडण्याचा आणखी एक वाईट परिणाम हा आहे कि मुरुमाच्या ठिकाणी रक्त येऊ लागते ज्यामुळे त्या ठिकाणी लाल रंगाचा मोठा डाग निर्माण होतो आणि आसपासची स्कीन वर आलेली दिसते ज्यामुळे चेहऱ्याचा तो भाग सहजपणे दिसू लागतो आणि तुमच्या मुरूम फोडण्याचा हेतू खराब होतो.

मुरुमाच्या समस्यांपासून त्रस्त असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा: जर चेहऱ्यावर नेहमी मुरूम येत असतील तर चेहरा स्वच्छ करण्यासाठी कपड्याचा वापर करा. केमिकल विरहीत नॅपकिन्सचा वापर करावा. झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा. दिवसभर चेहऱ्यावर धूळ जमा होते जी रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ करणे आवश्यक असते.

जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे ज्यामुळे आपली त्वचा कोरडी पडत नाही आणि शरीरामधील व्यर्थ पदार्थ सहजपणे साफ होत राहतात. नेहमी मुरूम फोडल्याने चेहरा खडबडीत आणि खड्ड्यांचे निशाण बनतात. जे कदाचित चेहऱ्यावर स्थायी रूप घेऊ शकतात. यामुळे चुकुनही चेहऱ्यावरील मुरूम फोडू नये.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने