आपल्यापैकी काही लोक असे आहेत जे अजाणतेपणाने अशा अनेक चुका करतात ज्याचा त्यांच्या शरीरावर खूप वाईट प्रभाव पडतो आणि असे काही लोक देखील आहे जे ज्यांना आपली बोटे मोडण्यामध्ये खूप मजा येते. काही लोक दिवसामधून १ किंवा २ वेळा बोटे मोडतात. तर काही लोक थोड्या थोड्या वेळाने आपली बोटे मोडतात.

पण असे केल्याने किती नुकसान होते हा कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आज आपण अश्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील बोटे मोडणे बंद कराल.

डॉक्टरांनुसार बोटे मोडणे चांगले तर नाहीच पण वाईट देखील नाही. जे लोक दिवसामधून अनेक वेळा बोटे मोडतात त्यांना सांधेदुखीची समस्या होऊ शकते कारण बऱ्याच अभ्यासामध्ये हा दावा केला गेला आहे कि बोटे मोडणे खूपच नुकसानदायक असते.

बोटे मोडण्याची सवय असल्यास आपल्याला संधिवात सारख्या आजार देखील होऊ शकतो. इतकेच नाही बोटे मोडण्याच्या सवयीमुळे संधिवात सारख्या आजाराचा बळी पडू शकतो कारण आपल्या बोटांची हाडे लिगामेंटशी एकमेकांशी जोडली गेलेली असतात पण जेव्हा आपण बोटे मोडतो तेव्हा या हाडांमध्ये क्रॅक येतो.

बोटांची हाडे एकमेकांशी लिगामेंटशी जोडली गेलेली असतात आणि आपण वारंवार बोटे मोडली तर यामध्ये असलेले लिक्विड कमी होऊ लागते आणि जर लिक्विड कमी झाले तर आपल्याला सांधेदुखीसारखा गंभीर आजारही होऊ शकतो.

जर एखादी व्यक्ती सतत आपली बोटे मोडत असेल तर तो आपल्या हाडांना सतत दुसऱ्या हाडांशी तंतो आणि जर सांध्यांना सातत खेचले तर हाडांमध्ये असलेली पकड देखील कमी होऊ शकते आणि आपली बोटे देखील तुटू शकतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने