तुम्ही स्वप्नामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी पाहिल्या असतील. पण याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल कि त्यामागे जरुर कोणतेना कोणते रहस्य लपलेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्नामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूचा आपल्या भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी संबंध असतो.

भविष्यामध्ये घटणाऱ्या घटना कधी कधी स्वप्नामध्ये पाहायला मिळतात. यामुळे जेव्हा देखील तुम्हाला काही स्वप्ने अशी दिसली जी आपल्या भुतकाळाशी संबंधित आहेत तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण असे करणे आपल्यासाठी कष्टकारी सिद्ध होऊ शकते. जर तुम्हाला स्वप्नामध्ये काही गोष्टी पुन्हा पुन्हा दिसत असतील तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतात. कारण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दिसली तर त्याला शुभ मानले गेले आहे.

उगवता सूर्य दिसणे: जे लोक ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात ते जरूर याला मानतात. तथापि हि गोष्ट बऱ्याच प्रमाणत खरी देखील आहे. पण जर तुम्हाला स्वप्नामध्ये सूर्योदय किंवा सूर्याचा प्रकाश दिसला तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत. कारण स्वप्नामध्ये जे आपल्याला पाहायला मिळते त्याचा आपल्या जीवनाशी संबंध असतो.

सूर्योदय दिसणे किंवा सूर्याचा प्रकाश दिसणे: याचा अर्थ असा होतो कि जीवनामध्ये प्रकाश पसरणार आहे . तेव्हा समजून जा कि तुमच्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुख येणार आहे. पण जर तुम्हाला स्वप्नामध्ये दुपार किंवा संध्याकाळची वेळ दिसली तर हे तुमच्यासाठी शुभ नाही.

मृत व्यक्ति दिसणे: जर तुम्हाला स्वप्नामध्ये मृत व्यक्ती दिसली तर समजून जा कि तुमच्या जीवनावरील मोठे संकट टळले आहे. असे दिसल्यास हे देखील समजून घ्या कि तुमचे आयुष्य खूप वाढले आहे आणि मृत व्यक्ती तुम्हाला स्वप्नामध्ये पैसे देऊन जात असेल तर तुमच्या व्यापारामध्ये वृद्धी होण्याची संभावना आहे. कारण मृत व्यक्ती जेव्हा पैसे देतो तेव्हा समजून जा कि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे.

पांढरी वस्तू दिसणे: ज्योतिष शास्त्रानुसार पांढरा रंग खूप शुभ असतो. हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतो. कारण पांढरा रंग आपल्याकडे व्यक्तीला लवकर आकर्षित करतो. जर तुम्हाला देखील स्वप्नामध्ये पांढरा दिसला तर समजून जा कि भविष्यासाठी तुम्हाला हा शुभ संदेश आहे.

पूजा करताना दिसणे: जर तुम्हाला स्वप्नामध्ये कोणी पूजा करताना दिसले तर हे तुमच्या आर्थिक लाभासाठी खूप चांगले आहे आणि तुमच्या करियरमध्ये देखील प्रगती प्रदान करेल. कारण देवाची मूर्ती दिसणे मोठ्या लाभाचे संकेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने