व्यक्तीची बॉडी लँग्वेज त्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगते. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटता तेव्हा त्याच्या बोलण्याच्या शैलीवरून त्याच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का कि व्यक्तीच्या मुठ बंद करण्याच्या प्रकारावरून त्या व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेतले जाऊ शकते. जेव्हा कोणी आपली मुठ बंद करतो तेव्हा तो आपली बोटे ज्याप्रकारे ठेवतो त्यावरून व्यक्तीच्या चारित्र्याविषयी देखील जाणून घेतले जाऊ शकते.

सर्व बोटे अंगठ्यावर: जर तुमची देखील बोटे मुठ बंद केल्यानंतर अंगठ्यावर येत असतील तर याचा अर्थ असा आहे कि तुम्ही एक रचनात्मक आणि बुद्धिमान व्यक्ती आहात. तुमच्यामध्ये कोणतेहि काम योग्य प्रकारे करण्याची अशी कला आहे जी कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही.

तुम्हाला पाहून अनेक लोक प्रेरित देखील होतात. याशिवाय तुम्हाला जास्त बोलायला आवडत नाही. तुमच्या बोलण्यामुळे कोणाला दुख होऊ नये यामुळे तुम्हाला शांत राहायला आवडते. तुम्ही प्रत्येकासोबत सहजपणे मैत्री करता.

सर्व बोटांवर अंगठा: प्रत्येकजण तुमच्या व्यक्तित्वामुळे तुम्हाला पसंत करतो. तुम्ही खूप दयाळू, बुद्धिमान आणि उदारमतवादी आहात. तुम्हाला जे योग्य वाटेल त्याचप्रकारे तुम्ही इतरांसोबत व्यवहार करता. कधी कधी भीती तुमच्यावर हावी जरूर होते पण तुम्ही त्यावेळी तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही स्वतःला दुखी करण्यापासून नेहमी घाबरत असता कारण खूपच कमी काळामध्ये तुम्ही इतरांकरून अपेक्षा करता.

एका बोटावर अंगठा: अशा लोकांची एक खास गोष्ट असते ती म्हणजे कल्पना करत राहणे. तुमच्यामध्ये उदारता, उत्साह आणि जिज्ञासा नेहमी भरलेली असते. ज्यामुळे सर्वजण तुमचे कौतुक करतात. तुम्ही दुखी व्यक्तीला देखील काही क्षणामध्ये हसवता.

लोकांना तुमच्यासोबत बोलायला आवडते. तुम्ही फक्त तेवढेच बोलता जितके तुम्हाला जरुरीचे वाटते. आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा असल्यामुळे लोक अनेकवेळा तुमचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने