जर कोणी तुम्हाला विचारले कि सर्वात स्वस्त आणि प्रभावी ब्यूटी सोल्यूशन कोणते आहे तर सर्वात पहिला मुलतानी मातीचे नाव समोर येते. हे तर सर्वांना माहिती आहे कि मुलतानी माती एक खूप चांगला ब्यूटी प्रोडक्ट आहे पण खूपच कमी लोकांना हे माहिती आहे कि याचा योग्य वापर कशाप्रकारे करतात.

सामान्यतः लोक याचा थेट वापर करतात पण जर तुम्ही थोडी मेहनत अजून केली तर याचे चांगले परिणाम मिळू शकतात. हे चेहरा साफ करण्यासाठी खूपच प्रभावी आहे. याच्या वापराणे डेड स्कीन देखील साफ होते. अनेक वेळा असे होते कि मुलतानी मातीच्या वापराणे चेहरा अधिकच ड्राय होतो. अशामध्ये याचा वापर काळजीपूर्वक करणे महत्वाचे आहे.

जर तुम्हाला चेहरा अधिक सुंदर आणि कोमल बनवायचा असेल तर थोडी मुलतानी माती घ्या आणि त्यामध्ये काही बदाम बारीक करून टाका आणि यासोबत थोडे दुध देखील मिसळा. हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या आणि चेहऱ्यावर लावा. जेव्हा हा लेप पूर्णपणे सुकेल तेव्हा स्वच्छ पाण्याचे चेहरा धुवून घ्या.

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी मुलतानी मातीमध्ये पुदिन्याची पाने बारीक करून मिसळा यासोबत यामध्ये थोडे दही मिसळून याची पेस्ट बनवून घ्या. नंतर याला चेहऱ्यावर लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील सर्व डाग निघून जातील. जर तुमची स्कीन ऑयली असेल तर मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिसळा आणि याला चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि चेहऱ्यावरील ऑयलीपणा निघून जाईल.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तुम्ही पपई आणि थोडे मध मुलतानी मातीमध्ये मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. जेव्हा चेहरा पूर्णपणे सुकेल तेव्हा थंड पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने चेहऱ्यावर ग्लो येते. चेहऱ्यावरील काळी वर्तुळे घालवण्यासाठी थोडे चंदन पावडर घ्या आणि यामध्ये टोमॅटोचा रस घाला. नंतर हे मुलतानी मातीमध्ये मिसळून याचा लेप चेहऱ्यावर लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग दूर होतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने