माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमध्ये काम केलेल्या अतुल विरकरने तू माझा सांगाती, लव्ह लग्न लोचा यासारख्या इतर अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. तो तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध मालिकेमध्ये देखील आपल्याला अभिनय करताना दिसला होता.

पण को रो ना मुळे गेल्या वर्षभरापासून त्याच्या हातामध्ये पुरुसे काम नाही आहे त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली आहे. त्यामध्ये दुर्दैव म्हणजे त्याच्या मुलाला एक गं'भी'र आजार झाला आहे ज्याच्या उपचारासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे देखील नाहीत. अतुल विरकरने लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. ज्याद्वारे तो आपल्या मुलाचा इलाज करू शकेल.

अतुल ठाण्यामधील वर्तक नगर परिसरामध्ये वास्तव्यास असून त्याचा मुलगा प्रियांश याला काही दिवसांपूर्वी फिट आली होती तेव्हापासून त्याला स्वतःवर ताबा राहिलेला नाही. याचे निदान केले असता हे समोर आले कि त्याला डेव्हलपमेंट डिले डिसऑर्डर हा आजार आहे.

या आजारामुळे त्याला मान देखील व्यवस्थित पकडता येत नाही. प्रियांशच्या उपचारावर गेल्या वर्षभरामध्ये जवळ जवळ तीन लाखाच्या वर खर्च आला आहे. प्रियांश या आजाराचा भारतामधील एकमेव रुग्ण असून जगामधील तो २३ वा रुग्ण आहे. त्याच्या उपचारासाठी जवळ जवळ आठ ते दहा लाख रुपये इतका खर्च येणार असून त्यासाठी अतुल विरकरने मदतीसाठी आवाहन केले आहे.

अभिनेता वरद चव्हाण याने यासंबंधी एक व्हिडिओ शेयर करत अतुलच्या मुलासाठी मदत करण्यास पुढे यावे असे आवाहन केले आहे. यासोबत वरदने काही स्क्रीनशॉट देखील शेयर केले आहेत. ज्यामध्ये अतुलच्या मुलावर उपचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने