मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे दु’ख’द नि’ध’न झाले आहे. किशोर नांदलस्कर यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे आज दुपारी ठाणे येथे को रो ना मु ळे नि’ध’न झाले.

दिग्गज अभिनेते किशोर नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी को रो नाची ला ग ण झाली होती. त्यांना ठाण्यामधील ग्लोबल को वि ड सें’ट’र येथे दाखल केले गेले होते. पण त्यांचे दुखद नि’ध’न झाले. किशोर नांदलस्कर यांनी आतापर्यंत जवळजवळ २५ पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नाना करते प्यार, सारे सज्जन, शेजारी शेजारी, हळद रुसली कुंकू हसले या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. किशोर नांदलस्कर यांनी चल आटप लवकर, पाहुणा सारख्या कॉमेडी नाटकांमध्ये देखील महत्वाची भूमिका बजावली.

महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव चित्रपटामधून त्यांनी बॉलीवूडमध्ये एंट्री केली. जिस देश मे गंगा राहता, हलचल, सिंघम यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या. किशोर नांदलस्कर अनेक वर्षे झाली बोरीवली येथे वास्तव्यास होते. पण त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे ते ठाण्यामध्ये आपल्या मुलाकडे वास्तव्यास आले होते. त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी तीन मुले असे कुटुंब आहे.

किशोर नांदलस्कर हे पूर्वी भोईवाडा-परळ येथे राहत होते. त्यांचे घर लहान असल्यामुळे ते मंदिरामध्ये झोपत असत. जवळ जवळ त्यांनी दीड वर्षे अशीच काढली. दिवसभर शुटींग केल्यानंतर ते रात्री झोपण्यास मंदिरामध्ये जात असत. एका पेपरमध्ये त्यांची हि बातमी आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री कोट्यामधून घर मिळाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने