२००८ मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट मराठी चित्रपट दे धक्का तर तुम्ही पहिलाच असेल. हा चित्रपट दर्शकांना खूपच आवडला होता आणि या चित्रपटामधील कलाकारांना देखील दर्शकांनी खूप पसंती दिली होती. सिद्धार्थ जाधवचा कॉमेडी अंदाज तर चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्याचबरोबर मकरंद अनासपुरे यांनी उत्कृष्ठ भूमिका साकारली होती.

या चित्रपटामध्ये आपल्याला दोन बालकलाकार पाहायला मिळाले होते ज्यांनी आपल्या अभिनयाने दर्शकांची मने जिंकली होती. या दोन्ही बालकलाकारांची नावे सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य अशी आहेत. हे दोन्ही बालकलाकार आता मोठे झाले आहेत आणि त्यांच्या लुकमध्ये खूप बदल झाला आहे. गौरीने या चित्रपटामध्ये सायलीची भूमिका साकारली होती.

सायलीच्या भुमिकेभोवतीच या चित्रपटाची कथा फिरत होती. गौरीवर चित्रित झालेले उगवली शुक्राची चांदणी हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. या गाण्यामुळे गौरीला एक नवीन ओळख मिळाली होती. पण आता गौरी खूपच मोठी झाली असून तिला ओळखणे देखील खूप कठीण झाले आहे. गौरी आता २५ वर्षांची झाली आहे. गौरीचे शिक्षण मुंबई येथील माटुंगा डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयामधून पूर्ण झाले. तिने इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मधून पदवी मिळवली आहे.

शिक्षणामुळे गौरीने अभिनयाकडे दुर्लक्ष केले. यादरम्यान ती कोणत्याही चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. पण ती लवकरच दर्शकांच्या भेटीला येण्याची तयारी करत आहे. कारण दे धक्का या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे अशी बातमी समोर आली आहे. यामध्ये गौरीला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दे धक्का चित्रपटानंतर गौरी शिक्षणाचा आयचो घो या चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळाली. ज्यामध्ये ती सक्षमच्या बहिणीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाली होती. २०११ मध्ये ती पुन्हा एकापेक्षा एक जोडीचा मामला या रियालिटी शोमध्ये सक्षमसोबत दिसली होती.

२०१५ मध्ये तिने आवाहन चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये तिने रूपाची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत सचिन खेडेकर, मनोज जोशी, कश्मीरा शाह, अमृता खानविलकर, सुबोध भावे हे कलाकार देखील मुख्य भुमिकेमध्ये होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने