आवळ्याला प्रत्येक रोगाचे औषध मानले गेले आहे. आवळ्याचे नियमित सेवन हृदयरोग, डायबिटीज, मूळव्याध, अल्सर, दमा, ब्रॉन्काइटिस आणि फुफ्फुसाच्या आजारामध्ये रामबाण काम ठरते. आवळ्याच्या सेवनाने वृद्धत्व दूर होते आणि तारुण्य कायम राहते, पाचन तंत्र सुधारते, डोळ्यांची दृष्टी सुधारते, स्मरणशक्ति वाढते, त्वचा आणि केसांना पोषण प्रदान करते. आज आम्ही तुम्हाला आवळ्याच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत.

जर तुम्ही दररोज आवळ्याचे सेवन केले तर नक्कीच तुम्ही अनेक वर्षे चिरतरुण राहाल. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. जी आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते. दररोज उपाशीपोटी आवळ्याचा मुरब्बा खाऊन दुध पिल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते.

हे खाल्ल्याने आपले पोट साफ राहते आणि अॅासिडिटी सारख्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर आवळ्याचे दररोज सेवन केल्याने आपली त्वचा तरुण राहते आणि केस देखील लांब आणि काळे होतात. आवळा केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.

आवळा, रिठा, शिकाकाई या तिन्हींचा काढा करून डोके धुतल्याने केस मऊ, जाड आणि लांब होतात. वाळलेला आवळा ३० ग्रॅम, बेहडा १० ग्रॅम, आंब्याची कोय ५० ग्रॅम आणि लोह चूर्ण १० ग्रॅम रात्री एका कढईमध्ये भिजत ठेवा. केसांवर याचा दरोज लेप लावल्याने लहान वयामध्ये पांढरे झालेले केस काही दिवसांमधेच काळे पडतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने