हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या भावामध्ये बहुपति प्रथा खूपच कमी झाली आहे पण तरीही काही ठिकाणी हि प्रथा अजून दिसून येते. तिबेटमध्ये देखील याचा उल्लेख केलेला मिळतो. हिमाचल आणि उत्तराखंड दोन्ही राज्यांच्या कबायली भागामध्ये आज देखील अनेक महिलांचे एकापासून ते पाच-सात पती असतात. दक्षिण भारत आणि ईशान्येकडील अनेक जमातींमध्ये अशीच प्रथा पाहायला मिळते.

अशा विवाहाला म्हंटले जाते ञमफो पोसमा: या प्रथेमध्ये एका महिलेला पतीच्या भावांसोबत देखील लग्न करावे लागते. पहिल्यांदा एक महिला कुटुंबातील एका पुरुषासोबत लग्न करते आणि नंतर तिचे लग्न पतीच्या भावांसोबत देखील होते. या प्रथेला कायदेशीर मान्यता नाही पण या समाजाची हि परंपरा आहे. अशाप्रकारच्या विवाहाला ञमफो पोसमा म्हंटले जाते.

पती बारी-बारीने वेळ घालवतात: या लग्नामध्ये सर्व पती बारी-बारीने पत्नीसोबत वेळ घालवतात. सामान्यतः कोणतीही तक्रार समोर येत नाही. येथील महिला आनंदाने हि परंपरा स्वीकारतात. जर एखाद्या महिलेच्या अनेक पतीपैकी एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या महिलेला दुख व्यक्त करू दिले जाऊ देत नाही.

टोपी सांगते कि कोणता भाऊ आहे पत्नीसोबत: लग्नानंतर भावांदरम्यान विवाहित जीवनाबद्दल एक सहमती बनते. एक टोपी त्यामध्ये महत्वाची भूमिका साकारते. जर एखाद्या कुटुंबामध्ये चार भाऊ असतील आणि सर्वांचा विवाह एकाच महिले सोबत झाला असेल तर अशा स्थितीमध्ये कोणता भाऊ तिच्यासोबत आहे तो खोलीच्या बाहेर आपली टोपी ठेवतो. यावरून हे समजते कि कोणतातरी भाऊ आतमध्ये आहे. तेव्हा कोणी दुसरे त्या खोलीमध्ये जात नाही. 

कसा होतो घटस्फोट: या विवाहामध्ये घटस्फोटाचा देखील रिवाज आहे. यासाठी सर्व भावांना एकत्र जाऊन घटस्फोटाची पारंपारिक परंपरा पूर्ण करावी लागते. यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये लोक बसतात. एक वाळलेली काठी आणली जाते. हि वाळलेली काठी तोडली जाते. काठी तोडण्याचा असा अर्थ होतो कि घटस्फोट घेऊन वेगळे होणे. यानंतर पती पत्नीमधील नातेसंबंध संपुष्टात येतात. तथापि घटस्फोटानंतर अनेक वेळा सहमतीने पुन्हा लग्न करण्याची देखील तरतूद आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने