बॉलीवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटासोबत बिजनेसदेखील करून करोडो रुपये कमवतात. कोणी रेस्टॉरंटचा बिजनेस करते तर कोणी ज्वेलरी लाईनचा बिजनेस सांभाळते. आज आपण बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या साईड बिजनेस करून करोडो रुपये कमवतात.

शिल्पा शेट्टी: ९० च्या दशकामधील टॉपची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपला पती बिजनेसमन राज कुंद्राप्रमाणे सफल बिजनेस वूमन म्हणून ओळखली जाते. बॉलीवूडमधील सर्वात फिट आणि हिट अभिनेत्रींपैकी एक शिल्पा शेट्टी रेस्टॉरंट, बार आणि स्पाच्या बिजनेसमधून वर्षाला करोडो रुपये कमावते. शिल्पाचे बांद्रामध्ये देखील रेस्टॉरंट आहे. त्याचबरोबर बांद्रा स्थित क्लब रॉयल्टी नाईट बारची देखील ती मालकीण आहे. इतकीच नाही तर तिने मुंबईच्या वरळी भागामध्ये देखील बास्टियन चेन नावाने रेस्टॉरंट सुरु केले आहे.

सुष्मिता सेन: बॉलीवूडच्या सफल अभिनेत्रींपैकी एक सुष्मिता सेन एक ज्वेलरी लाईन चालवते. माहितीनुसार तिचा हा बिजनेस तिची आई सांभाळते. तर सुष्मिता सेन एक प्रोडक्शन कंपनी तंत्रा एंटरटेनमेंटची ती मालकीण आहे.

दीपिका पादुकोण: आजच्या काळामध्ये सर्वात चर्चित आणि सफल बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ऑनलाईन फॅशन लाईन, ऑल अबाउट सुरु केले आहे. इथून कोणाला सामान खरेदी करायचे असेल तर Myntra वर ते सहजपणे उपलब्ध आहे.

कॅटरिना कैफ: हिंदी चित्रपटामधील चर्चित अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री कॅटरिना कैफचे नाव देखील बिजनेस वूमनमध्ये घेतले जाते. कॅटरिनाने २०१९ मध्ये भारतीय सौंदर्य रिटेलर, न्याका सोबत भागीदारीमध्ये आपला एक ब्युटी ब्रँड Kay लॉन्च केला होता. असे म्हंटले जाते कि हे प्रोडक्ट्स मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

अनुष्का शर्मा: अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव देखील या यादीमध्ये सामील आहे. आपल्या भावासोबत मिळून तिने चित्रपटाची निर्मिती व वितरण कंपनी क्लीन स्लेट फिल्म्स सुरू केली होती. खास बाब हि आहे कि आता प्रोडक्शन हॉउसच्या बॅनरखाली एनएच १०, फिलोरी आणि परी सारख्या चित्रपटांची निर्मिती झाली आहे.

सनी लियोनी: अ*श्ली*ल चित्रपटांचे जग सोडून हिंदी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणारी सनी लियोनीला संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि सनी एक ऑनलाइन अ*ड*ल्ट स्टो’र चालवते आणि ती अ*ड*ल्ट टॉ’य’ज, एट्रेक्टिव कॉस्टयूम, पार्टी वियर, स्विम वियर, लाईफस्टाईल एसेसरीज सारखे प्रोडक्ट विकते. त्याचबरोबर ती लस्ट नावाने एक परफ्यूम आणि कॉस्मेटिक लाईन देखील चालवते.

करिश्मा कपूर: ९० च्या दशकामध्ये आपल्या उत्कृष्ठ अदाकारीने करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री करिश्मा कपूर आता चित्रपटांमध्ये पाहायला मिळत नाही. ती एक ऑनलाइफ बेबी क्लोथिंग स्टोर चालवते. असे म्हंटले जाते कि याच्या अंतर्गत नवजात बालकांना आणि आई बनणाऱ्या महिलांना आवश्यक असणारी प्रत्येक वस्तू मिळते.

ट्विंकल खन्ना: ट्विंकल खन्ना बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. सध्या ती अभिनेत्री म्हणून सक्रीय नाही. ती आज एक लेखिका म्हणून आपले नाव प्रसिद्ध करत आहे. ट्विंकल ब्लॉगर म्हणून देखील काम करते. त्याचबरोबर ट्विंकल आपला पती अक्षय कुमारचा हिट चित्रपट पॅडमॅनची प्रोड्यूसर देखील राहिली आहे. ती द व्हाइट विंडोची फाउंडर आहे आणि गुरलीन मनचंदा सोबत इंटीरियर डिज़ाइनिंगचा बिजनेस देखील चालवते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने