टूथब्रशचा वापर प्रत्येकजण आपले दात स्वच्छ करण्यासाठी करतो. पण अनेक वेळा तुम्ही हे देखील पाहिले असेल कि लोक टूथब्रशचा वापर इतर अनेक छोट्या छोट्या घरगुती कामासाठी देखील करतात. अनेक लोक टूथब्रशचा वापर बूट, बॅग, कंगवा, आणि काच साफ करण्यासाठी देखील करतात.

पण आपण अशी गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यावर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. तुम्ही कधी ऐकले आहे का कि टूथब्रशचा वापर तुम्ही चेहऱ्याची सफाई करण्यासाठी देखील करू शकता. चकित झालात ना पण हे खरे आहे.

टूथब्रशचा वापर दात घासण्याशिवाय चेहऱ्यावर देखील केला जाऊ शकतो आणि याच्या वापराणे तुम्ही चेहऱ्यावरील मुरूम, ब्लॅकहेड्स सारखी समस्या काही मिनिटांमध्ये दूर करू शकता. आपल्या सर्वांना तर हे माहितीच आहे कि ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. पण तुम्ही चेहऱ्यावर टूथपेस्ट लावून त्याला टूथब्रशने साफ करणे देखील एक सोपा उपाय आहे. यासोबत हा उपाय खूपच प्रभावी ठरू शकतो.

यासाठी सर्वात पहिला टूथब्रशवर टूथपेस्ट लावून घ्या आणि नंतर आपला चेहरा स्वच्छ धुवून चांगला पुसून घ्या. यानंतर ब्रश थोडा ओला करून ब्रशच्या मदतीने टूथपेस्ट ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा आणि काही वेळ याला हळू हळू रगडा यानंतर चेहरा पुन्हा धुवून घ्या.

असे करताना हे लक्षात ठेवा कि पेस्ट तुमच्या डोळ्यांच्या संपर्कामध्ये येऊ नये. त्याचबरोबर याकडे देखील लक्ष द्या कि याचा प्रयोग केल्यानंतर टूथपेस्टं पुन्हा वापरण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये चांगली खंगाळून घ्या आणि नंतरच त्याचा पुन्हा वापर करा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने