पैंजण पायाचे सौंदर्य वाढवते त्याचबरोबर पैंजण घातल्याने महिलांच्या शरीराला देखील लाभ मिळतो. जर महिला सोन्या-चांदीच्या वस्तू घालत असतील तर त्या शरीराला रगडतात ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात. पण पैंजण नेहमी चांदीचेच शुभ मानले जातात आणि त्याचबरोबर वास्तूशास्त्रानुसार सोने पायामध्ये कधीच घालू नये. सोने हातामध्ये किंवा गळयामध्ये घालणे शुभ मानले जाते.

चांदी थंड धातू आहे. आयुर्वेदानुसार व्यक्तीचे डोके थंड आणि पाय गरम असायला हवे. यामुळे शरीराच्या वरच्या भागामध्ये सोने आणि पायामध्ये चांदी घातली जाते. यामुळे डोक्यामधील उत्पन्न गरम उर्जा पायामध्ये आणि पायामध्ये उत्पन्न झालेली थंड उर्जा डोक्यामध्ये जाते ज्यामुळे संपूर्ण शरीराचे तापमान संतुलित राहते.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पैंजण घालणे खूपच शुभ मानले जाते. तर वास्तूशास्त्रानुसार पैंजणाच्या आवाजाने घरामधील नकारात्मक उर्जा कमी होते आणि दैवी शक्ती सक्रीय होते. यामुळे घरामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी पैंजण घालणे जरुरीचे असते.

महिलांच्या पायामध्ये पैजण घालण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. असे म्हंटले जाते कि पैंजणाच्या आवाजाने घरच्या पुरुषांना आधीच समजते कि घरामधील महिला त्यांच्याकडे येत आहे आणि ते येण्यापूर्वी सतर्क होतात.

जुन्या काळामध्ये स्त्रियांना पतीच्या घरामध्ये कोठेही येण्या-जाण्यास पूर्ण स्वातंत्र्य नव्हते. त्या कोणासोबत उघडपणे बोलू देखील शकत नव्हत्या. अशामध्ये जेव्हा त्या घरामध्ये कोठेही येत-जात होत्या तेव्हा पैजणाच्या आवाजाने सर्व सर्व सदस्य समजून जात होते कि सून येत आहे आणि कुठेतरी जात आहे.

आधुनिक युगामध्ये देखील महिला आणि मुली पैंजण घालतात. आज देखील हि परंपरा पाळली जात आहे. अनेक मुली फॅशन म्हणून एका पायामध्ये देखील पैजण घालतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने