भारतीय संस्कृती आणि परंपरा नुसार प्रत्येक मुलीला नाक टोचणे अनिवार्य आहे. नाकामध्ये नथ घातल्याने महिला किंवा मुलीच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. अनेक ठिकाणी तर अशी परंपरा आहे कि जोपर्यंत नाक टोचले जात नाही तोपर्यंत लग्नच होत नाही.

लग्नासाठी एक अट नाक टोचणे देखील असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कि नाक टोचणे इतके जरुरीचे का मानले जाते. भारतामधील प्रत्येक मुलगी नाक का टोचून घेते आणि डाव्या बाजूलाच नाक का टोचले जाते.

महिलांच्या नाक टोचण्याची परंपरा १६ व्या दशकापासून चालत आली आहे. नाक टोचण्याचे कोणतेही वय नाही पण असे म्हंटले जाते कि लग्नाअगोदर प्रत्येक भारतीय मुलीचे नाक टोचलेले असावे. चला तर आपण नाक टोचण्यामागे काही कारणे जाणून घेऊया.

नाक टोचणाऱ्या महिलेच्या शरीरामध्ये प्रेशर हार्मोनचा विकास होतो ज्यामुळे वेदना सहन करण्याची ताकद मिळते कारण हे हार्मोन वेदनेवर दबाव टाकतो आणि असे होण्याने महिलेला वेदनेपासून आराम मिळतो. त्याचबरोबर महिलेची ज्यावेळी प्रसूती होते त्यावेळी महिलांना खूप वेदना होतात आणि ज्या महिलेचे नाक टोचलेले असते त्या महिलेला वेदना कमी होतात. इतकेच नाही तर बाळाच्या जन्माच्या वेळी देखील नाक टोचणाऱ्या महिलेला वेदनेमध्ये आराम मिळतो.

नेहमी असे पाहायला मिळते कि महिलांचे नाक डाव्या बाजूला टोचलेले असते, असे यामुळे कारण कि स्त्रीच्या शरीराचे सर्व प्रजनन अंग डाव्या बाजूला जोडलेले असतात आणि हेच कारण आहे कि महिलांचे नाक डाव्या बाजूला टोचलेले असते.

एखाद्या स्त्रीला सुंदर दिसणे खूप महत्वाचे मानले जाते आणि नथ घातल्याने स्त्रीच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते आणि स्रीं च्या सौंदर्यामध्ये दुप्पटीने वाढ होते. पण हेच कारण नाही कि महिला नाक टोचून घेतात आम्ही सांगितलेली वरील कारणे देखील आहेत ज्यामुळे महिला नाक टोचून घेतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने