तुम्ही नागा साधूंबद्दल तर ऐकलेच असेल, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि महिला नागा साधूंचे जीवन देखील कमी रंजक नाही. त्यांना देखील कठोर तपश्चर्यातून जावे लागते तेव्हा कुठे त्या नागा साधू बनू शकतात.

तुम्ही नागा साधूंचा रहस्यमयी जगताबद्दल कधीना कधी ऐकलेच असेल पण तुम्हाला हे माहिती आहे का कि महिला नागा साधूंचे जग देखील रहस्यांनी भरलेले आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया महिला नागा साधूंसंबंधी अशाच काही रंजक गोष्टी ज्या तुम्ही याआधी कधीच ऐकल्या नसतील.

एका महिलेला नागा साधू बनण्यासाठी ६ ते १२ वर्षे कठोर ब्रम्हचर्यचे पालन करावे लागते. ज्या महिलेला नागा साधू बनायचे आहे तिला आपल्या गुरूला विश्वास द्यायचा असतो कि ती ब्रम्हचर्यचे पालन करत करू शकते. तेव्हाच तिला गुरु महिला नागा साधूची दीक्षा देतो.

सर्वात आश्चर्याची बाब हि आहे कि हिंदू परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीचे मृत्यूनंतर पिंडदान केले जाते पण नागा साधू बनण्यापूर्वी महिलेला आपले पिंडदान स्वतः करावे लागते. महिला नागा साधू बनताच आपल्या डोक्याचे मुंडन करावे लागते. मुंडन केल्यानंतर नदीमध्ये स्नान करवले जाते. यानंतर सर्वात कठीण काम म्हणजे महिलेला आपल्या कुटुंबाचा मोह भंग करावा लागतो.

अस म्हंटले जाते कि सामान्यतः पुरुष नागा साधू नेहमी नि’व’स्त्र राहतात पण महिला नागा नेहमी पिवळे वस्त्र परिधान करतात. नागा बनताच महिलेला सर्व लोक माता म्हणून संबोधतात. साधू बनण्यासाठी या प्रक्रीयेमधून जावे लागते. मग ती महिला नागा साधू असो किंवा पुरुष नागा साधू असो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने