हस्तरेषा शास्त्रानुसार धन रेषा करंगळी बोटाच्या खाली असते. अशी रेषा कोणाच्या हातामध्ये पाहायला मिळत नाही. पण ज्यांच्या हातामध्ये असते असे लोक खूप भाग्यशाली मानले जातात. हातामधील रेषा व्यक्तीच्या जीवनाबद्दल बरेच काही सूचित करतात.

अनेक ज्योतिष हात पाहून आपल्या भविष्य आणि भुतकाळाबद्दल बरेच काही सांगतात. हातामध्ये अनेक रेषांसोबत धन रेषा देखील असते. जे आपली आर्थिक स्थितीबद्दल देखील खूप काही सांगतात. आज आपण धन रेषा बद्दल जाणून घेणार आहोत.

अशी धन रेषा असते शुभ: धन रेषा करंगळी बोटाच्या खाली असते. अशी रेषा प्रत्येकाच्या हातामध्ये नसते. पण ज्यांच्या हातामध्ये असते असे लोक खूप भाग्यशाली मानले जातात. हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या हातामध्ये धन रेषा गडद असते असे लोक समजदारीने गुंतवणूक करतात. ज्यांच्या हातामध्ये हि रेषा चंद्र पर्वतापर्यंत जाते असे लोक देखील खूप भाग्यशाली मानले जातात.

अशी धन रेषा असल्यास वाढतात समस्या: ज्या लोकांच्या हातामध्ये हि रेषा सरळ न जाता वाकडीतिकडी असते अशा लोकांना धन प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. ज्या लोकांच्या हातामध्ये हि रेषा तुटक तुटक असते त्यांना देखील पैसे कमवण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने