हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि आपण चार पोजिशनमध्ये झोपतो, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, सरळ आणि उलटे किंवा पोटावर आपण याचप्रकारे झोपतो. कधी कधी आपण पाहिले असेल कि जेव्हा आपण झोपतेवेळी घाबरतो किंवा काही विचित्र स्वप्ने पडतात ते झोपतेवेळीच पडतात.

अनेक वेळा आपण अशा पोजिशनमध्ये झोपतो ज्यामुळे अनेकवेळा आपली तब्येत बिघडते आणि आपल्याला ते समजत देखील नाही कि आपली तब्येत आपल्या झोपण्याच्या पोजिशनमुळे खराब झाली आहे. तर यासोबतच आपण झोपतो तेव्हा झोप देखील चांगली येते आणि मन देखील शांत राहते.

१. जेवण केल्यानंतर तुम्ही लगेच डाव्या बाजूला तोंड करून झोपत असाल तर शरीरामध्ये भोजन हळू हळू पचते. तर असे केल्याने आपल्या शरीराचे तापमान देखील योग्य राहते कारण शरीराच्या डाव्या बाजूला पचन तंत्र असते आणि हृदय देखील डाव्या बाजूला असते. जर याच्या उलट जेव्हा कोणी उजव्या बाजूला झोपतो तेव्हा जेवण लवकर पचते आणि शरीराला खूप नुकसानदायक ठरू शकते.

२. बऱ्याचदा आपण झोपतेवेळी उशी लावून सरळ झोपू नये कारण असे केल्याने आपल्या मणक्याच्या हाडावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जर उशी लावून झोपायचे असेल तर डाव्या बाजूला तोंड करून झोपावे असे केल्याने मणक्याचे हाड एकदम सरळ राहते.

३. हे लक्षात ठेवा कि कोणत्याही व्यक्तीने पोटावर झोपू नये. असे केल्याने शरीराला जास्त नुकसान पोहोचते आणि पोटावर झोपल्याने शरीरावर जास्त वजन पडते ज्यामुळे हृदयासंबंधी आजार होण्याची संभावना असते. इतकेच नाही तर एका शोधामध्ये हे देखील समोर आले आहे कि पोटावर झोपणे हि सर्वात खराब पोजिशन आहे. यामुळे पोटावर कधीच झोपू नये.

४. शोधामध्ये हे देखील समोर आले आहे कि जवळ जवळ ७५% लोक गुडघे मोडून झोपतात. ज्यामुळे गुडघ्यांच्या सांध्यांवर वाईट परिणाम पडतो आणि यामुळे वेदना आणि थकवा देखील जाणवतो. ज्या व्यक्तीची गुडघे मोडून झोपण्याची सवय मोडत नसेल त्याने गुडघ्यांमध्ये उशी ठेवून झोपावे. जर एक चांगली झोप हवी असल तर या पोजिशनमध्ये झोपू नये हेच चांगले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने