व्यक्तीच्या बोटांवरून त्याच्याबद्दल बरीच माहिती जाणून घेतली जाऊ शकते. तर तुम्ही विचार करत असाल कि हे कसे होऊ शकते आणि असे असेल तर आपल्याला ज्योतिष्याकडे जावे लागेल, पण असे काही नाही तुम्हाला कुठेही जायची गरज नाही घरीच तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता.
नशिबाचे धनी अशा लोकांना म्हंटले जाते ज्यांची कामे चुटकीसरशी होतात. ज्यांना सफलता पहिल्याच प्रयत्नामध्ये मिळते. शरीराच्या बनावटीमध्ये हाताच्या बोटांद्वारे व्यक्तित्वबद्दल जाणून घेतले जाऊ शकते आणि याबद्दल शास्त्रामध्ये देखील सांगितले गेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या बोटांद्वारे बरेच काही जाणून घेतले जाऊ शकते. आज आपण तर्जनी आणि अनामिका बोटाबद्दल जाणून घेणार आहोत.
तर्जनी अनामिकापेक्षा मोठी असणे: सर्वात पहिला तर हे जाणून घ्या कि ज्या व्यक्तीची तर्जनी अनामिका बोटापेक्षा मोठी असते अशी व्यक्ती खूप शांत स्वभावाची असते इतकेच नाही तर अशा लोकांना नेहमी काहीतरी नवीन शिकायचे असते आणि हे नेहमी आपले कार्य करत राहतात. हे लोक लाईफमध्ये कितीही समस्या आल्या तरी धैर्याने त्याचा सामना करतात.
अनामिका तर्जनीपेक्षा मोठी असणे: ज्या व्यक्तीचे अनामिका बोट तर्जनीपेक्षा मोठे असते असे लोक थोडे रागीट स्वभावाचे असतात. यांना राग खूप लवकर येतो. पण हे कोणालाही नुकसान पोहोचवत नाहीत. यांचा राग फक्त काही क्षणासाठी असतो. हे लोक फक्त स्वप्ने पाहत नाहीतर तर ती पूर्ण देखील करतात.
तर्जनी आणि अनामिका बोट समान असणे: ज्या लोकांची हि दोन्ही बोटे समान असतात असे लोक खूप शांत स्वभावाचे असतात. इतकेच नाही तर अशा लोकांना समाजामध्ये खूप मानसन्मान मिळतो. पण जर यांना कोणी डिवचले तर त्यांना खूप राग येतो.
टिप्पणी पोस्ट करा