प्रोटीनचा पावरहाउस म्हणून ओळखले जाणारे अंडे लोक प्रत्येक हंगामामध्ये खाणे पसंत करतात. असे मानले जाते कि अंडे खाल्ल्याने आपले आरोग्य खूप चांगले राहते. हि गोष्ट सत्य आहे पण पूर्णपणे नाही. तुम्हाला कदाचित माहिती नाही कि जर तुम्ही प्रतिदिन अंडी खात असाल तर दिवसामधून दोनपेक्षा जास्त अंडी खाऊ नये. अन्यथा तुम्हाला फायद्याच्या ठिकाणी नुकसान पोहोचू शकते. चला तर जाणून घेऊया गरजेपेक्षा जास्त अंडी खाण्याच्या नुकसानीबद्दल.

अंड्यामध्ये १८५ एम जी कोलेस्टेरॉल असतो आणि तुमच्या शरीरासाठी दिवसामधून फक्त ३०० एम जी कोलेस्टेरॉलची गरज असते. जर तुम्ही कोलेस्टेरॉलकडे लक्ष दिले तर ३ किंवा ४ अंडी खाणे शरीरासाठी चांगले मानले जात नाही.

तर अंडी खाताना हवामान देखील लक्षात ठेवणे खूपच आवश्यक मानले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये याची मात्रा वाढवली जाऊ शकते पण गरमीमध्ये फक्त २ किंवा ३ अंडी खावीत. वास्तविक अंडी खाल्ल्याने शरीरामध्ये गरमी वाढते आणि यामुळे आपल्या पोटामध्ये वेदना होऊ शकतात.

तसे तर अंडी कोणत्याही प्रकारे खाल्ली जाऊ शकतात पण अंडी उकडून खाणे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानली जातात आणि अशाप्रकारे तुम्हाला जेवणामध्ये एक्स्ट्रा मीठ आणि तेल घालण्याची गरज देखील भासत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने