आजकाल स्टाईलिश आणि मोठी दाढीची फॅशन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मुले क्लीन शेव पेक्षा दाढी ठेवणे जास्त पसंत करत आहेत. हि गोष्ट वेगळी आहे कि दाढीनुसार आणि फॅशननुसार दाढी ठेवली जाते. पण खूपच कमी लोकांना माहिती आहे कि दाढी पाहून व्यक्तीचा स्वभाव ओळखला जाऊ शकतो. समुद्रशास्त्रानुसार व्यक्तीच्या अंगावरून त्याचा स्वभाव जाणून घेतला जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊया.

लांब दाढी: लांब दाढी सामान्यतः लांब, दाट आणि खालच्या बाजूने टोकदार असते. अशा व्यक्तीमध्ये दृढनिश्चय, सहनशीलता, गंभीरता, संयम, चिंतन आणि सात्विक गुण असतात. पण जर दाढी विखुरलेली असेल तर कट्टरपंथी, रूढ़ी, अंधविश्वासी असू शकतो.

छोटी दाढी: भविष्यपुराणानुसार ज्या व्यक्तीची छोटी दाढी असते म्हणजे नैसर्गिक रूपाने छोटी असते त्याला छोटी दाढी म्हणतात. असे लोक रचनात्मक कार्यांमध्ये कुशल असतात. यांना गुप्त विधांप्रती जास्त आकर्षण असते. त्याचबरोबर हे लोक रहस्यात्मक शास्त्रामध्ये ज्ञानी असतात.

आसमानी दाढी: ज्या व्यक्तीची दाढी ढगाप्रमाणे आलेली असते जसे गालावर आणि हनुवटीवर केस असतील आणि हनुवटीवर नसतील किंवा गालावर नसतील तर ती आसमानी दाढी म्हणून ओळखली जाते. या प्रकरचे व्यक्ती चंचल, उच्छृंखल, अविश्वस्त, धूर्त आणि कूटनीतिज्ञ प्रवृत्तिचे असतात.

स्टाईलिश दाढी: अशा प्रकारच्या दाढीमध्ये फ्रेंच, रूसी इत्यादी शैली असतात. अशी व्यक्ती एक नेता, चित्रकार, कवि, पत्रकार किंवा अभिनेता असू शकते. आजकाल अशाप्रकारची दाढी ठेवण्याची फॅशन तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

विभाजित दाढी: लांब दाढी जर खालच्या बाजूने दोन समान दोन भागांमध्ये विभागलेली असते. अशी व्यक्ती मन किंवा मस्तिष्कच्या विचारांच्या मध्य द्वंद्व चालत राहतो. तो कधी शांत तथा गंभीर तर कधी चंचल किंवा अस्थिर असतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने