असे म्हंटले जाते कि प्रेम सौंदर्य पाहून करू नये तर एक मनापासून खऱ्या व्यक्तीसोबत करावे कारण चेहऱ्याचे सौंदर्य तर काळानुसार कमी होते पण एक साफ मनाचा व्यक्ती नेहमी आपल्या चांगल्या स्वभावाने आपल्या पार्टनरचे जीवन स्वर्ग बनवतो आणि यामुळे असे म्हंटले जाते कि प्रेमासाठी सौंदर्य नाही तर एक चांगला स्वभाव एक चांगले मन असणे आवश्यक आहे.

असा व्यक्ती जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती असतो आणि आज आपण एक अशीच खरी प्रेम कहाणी सांगणार आहोत ज्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यामध्ये पाणी येईल. चला तर जाणून घेऊया या सुंदर लव्हस्टोरीबद्दल.

आम्ही जी स्टोरी तुम्हाला सांगणार आहोत ती एका शेतकऱ्याची मुलगी आणि एका श्रीमंत घरच्या मुलाची लव्हस्टोरी आहे. ज्यामध्ये मुलाचे नाव शिवम आहे आणि जो बेंगलोरच्या एका प्रसिद्ध घरामधील मुलगा आहे आणि एकदा शिवमची नजर एका मुलीवर पडते जी दिसायला खूपच सुंदर असते आणि सरळ स्वभावाची होती.

तिला पाहताच शिवम पहिल्या नजरेमध्येच तिच्या प्रेमामध्ये पडतो आणि जेव्हा शिवमने त्या मुलीबद्दल सर्व माहिती मिळवली तेव्हा त्याला असे समजले कि ती एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि एक दिवस शिवमने स्वतः त्या मुलीजवळ जाऊन आपले प्रेम व्यक्त केले पण त्या मुलीने स्पष्ट नकार दिला.

पण त्यानंतर शिवमने हार मानली नाही आणि तो स्वतः त्या मुलीच्या घरी गेला आणि तिच्या वडिलांकडे तिचा हात मागितला. त्या मुलीच्या वडिलांनी पाहिले मुलगा संपन्न घरामधील आहे आणि तो आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो या कारणामुळे त्यांनी या नात्यासाठी होकार दिला आणि दोघांचेहि धुमधडाक्यात लग्न झाले.

लग्नानंतर शिवम आपल्या पत्नीसोबत आनंदाने आयुष्य घालवू लागला आणि काही वर्षे उलटल्यानंतर एकदा शिवमच्या पत्नीला त्वचा रोग झाला. शिवमने तिचा खूप इलाज केला पण ती ठीक झाली नाही आणि हळू हळू त्या मुलीचे सौदर्य कमी होऊ लागले.

ती खूपच जास्त आजारी राहू लागली आणि यासोबत तिला सर्वात जास्त हि चिंता सताऊ लागली कि जर ती कुरूप झाली तर तिचा पती तिला सोडून देईल कारण तिला असे वाटत होते कि शिवमने तिच्या सौंदर्यावर प्रेम केले होते जे आता हळू हळू नष्ट होऊ लागले होते. या चिंतेमध्ये शिवमची पत्नी अधिकच आजारी राहू लागली.

एकदा ऑफिसमधून घरी येताना शिवमचा अपघात झाला आणि अपघातामध्ये शिवमच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. जेव्हा शिवमच्या पत्नीला हे सर्व माहित झाले तेव्हा ती खूप दुखी झाली आणि आपल्या पतीची खूप सेवा करू लागली. आता तिच्या मनामधून हि भीती निघून गेली होती कि तिचा पती तिचा कुरूप चेहरा पाहू शकणार नाही.

आता दोघे एकमेकांसोबत आनंदाने राहू लागले पण काही काळानंतर शिवमच्या पत्नीची तब्येत खूपच जास्त बिघडली आणि ती काही दिवसांनंतर या जगामधून निघून गेली. तिच्या जाण्यानंतर शिवम पूर्णपणे खचला आणि तो आपले घर सोडून जाऊ लागला.

जेव्हा तो घर सोडून जात होता तेव्हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला विचारले कि भाऊ तुझी पत्नी आता या जगामध्ये नाही आणि तू अंधळा आहेत अशा परिस्थितीमध्ये तू कुठे जाणार आणि तुझी काळजी कोण घेणार. तेव्हा शिवमने जी गोष्ट सांगितली ती ऐकून त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आले.

शिवमने सांगितले कि मी कधीच अंधळा नव्हतो मी फक्त अंधळे होण्याचे नाटक केले होते जेणेकरून माझ्या पत्नीच्या मनामधून हि भीती निघून जाईल कि मी तिला तिच्या कुरूप चेहऱ्यामुळे सोडून देईल. आज ती माझ्यासोबत नाही पण मी तिच्या आठवणीमध्ये माझे आयुष्य घालविण. अशाप्रकारे शिवमने हे सिद्ध केले कि खरे प्रेम मनापासून केले जाते रंगावरून किंवा सौंदर्य पाहून केले जात नाही. खऱ्या प्रेमामध्ये जितकी ताकद असते तितकी कशामध्ये नसते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने