तसे तर उन्हाळा ऋतू खूपच कमी लोकांना आवडत असेल. यादरम्यान येणाऱ्या घामामुळे आणि अधिक उन्हामुळे उन्हाळ्याच्या ऋतूपेक्षा हिवाळा आणि पावसाळा ऋतू लोकांना जास्त आवडतो. पण एक असे कारण आहे ज्यामुळे अनेक लोक उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. लोक या ऋतूची आतुरतेने वाट पाहतात कारण या ऋतूमध्ये आंबे खायला मिळतात.

कदाचित असा कोणताही व्यक्ती नसेल ज्याला आंबे खायला आवडत नसतील. हेच कारण आहे कि आंब्याला फळांचा राजा म्हंटले जाते. आंबा दिसायला जितका चांगला असतो तितकाच तो आतून देखील चवदार असतो. पण तुम्हाला माहिती आहे का कि काही अशा गोष्टी देखील आहेत ज्या आंबा खाल्ल्यानंतर आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकतात.

तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि चविष्ठ आंब्याच्या मागे खूप मोठा धोका देखील लपलेला आहे. हे इतके धोकादायक ठरू शकते कि आपण आजारी देखील पडू शकतो. आंब्याचे सेवन केल्यानंतर या तीन गोष्टी खाणे टाळले पाहिजे. या तीन गोष्टी खूप घातक ठरू शकतात.

कारले खाऊ नये: कारले जरी कडु असले तरी याला आयुर्वेदामध्ये औषध म्हणून ओळखले जाते. अनेक आजारांमध्ये कारले रामबाण सिद्ध झाले आहे. याशिवाय त्वचा रोग, चरबी कमी करणे, रक्त साफ करणे इत्यादी समस्यांमध्ये कारल्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला जाणून हैराणी होईल कि चवदार आंबा खाल्ल्यानंतर औषधी गुणांनी भरपूर कारले खाणे आरोग्यासाठी घातक होऊ शकते.

कारण कारले अनेक गुणांनी परिपूर्ण असते, त्याचबरोबर आंबा खाल्ल्यानंतर कारले खाल्ल्यास उलट स्वाद तोंडामध्ये जातो. ज्यामुळे उलटी, मळमळ, श्वास घेण्यास त्रास इत्यादी समस्या होऊ शकतात. ज्या जर अधिक वाढू लागल्या तर ते आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते.

हिरवी मिरची: हिरवी मिरची अन्नाची चव वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली होते. भारतामध्ये बहुतेक लोक तिखट खाणे पसंत करतात. पण जर तुम्ही आंबा खाऊन हिरवी मिरची खात असाल तर सावधगिरी बाळगा.

कारण आंबा जितका गोड असतो हिरवी मिरची तितकीच तिखट असते. अशामध्ये दोन्ही एकत्र आल्यास आपल्या आरोग्यासाठी हे घातक सिद्ध होऊ शकते. आंबा खाल्ल्यानंतर हिरवी मिरची खाल्ल्यास आपल्या आतड्यांना नुकसान पोहोचू शकते.

रायता: बऱ्याच लोकांना तोंडाची चव वाढवण्यासाठी रायता खायला आवडते. याच्या चवीमुळे सामान्यतः मध्य प्रदेश मध्ये रायता मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. पण आंबा खाल्ल्यानंतर रायता खाऊ नये यामुळे खूप नुकसान पोहोचू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने