असे म्हंटले जाते कि नाते तेव्हाच मजबूत होते जेव्हा त्यामध्ये विश्वास आणि सत्यता असते. असे पाहिले गेले आहे कि विश्वास नसल्यास अनेक नाती तुटतात. खरा व्यक्ती डोळे बंद करून कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवतो. जेव्हा तोच व्यक्ती त्या व्यक्तीला धोका देतो तेव्हा त्या व्यक्तीला ते समजत नाही. जेव्हा समजते तेव्हा खूपच वेळ झालेला असतो. अशामध्ये तो व्यक्ती कोणावरहि विश्वास ठेऊ शकत नाही.

आजचे जग मतलबी आहे. मग पती-पत्नी असो किंवा प्रेमी-प्रेमिका सर्व आपल्यासाठीच जगत असतात आणि यामुळेच एक दिवस नात्यामध्ये धोका देण्याचे कारण बनते. जर तुम्हाला धोक्यापासून वाचायचे असेल तर पार्टनरच्या काही संकेतांना समजणे आवश्यक आहे.

१. फोन लपवणे: जर पार्टनर आपला फोन लपवून ठेवतो, त्याला नेहमी भीती वाटते कि त्याचा फोन तुम्ही चेक कराला तेव्हा हि भीती एक निशाणी असते कि तो तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे. पार्टनरपासून काहीही लपवण्याचा अर्थ तो आपल्या पार्टनरशी खोटे बोलत आहे आणि त्याला धोका देत आहे. जेव्हा हे संकेत मिळतील तेव्हा सावधान व्हायला हवे.

२. घरातून बाहेर राहणे: जर तुमचा पार्टनर कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर जाण्याची गोष्ट पुन्हा पुन्हा करत असेल तर समजून घ्यावे कि काहीतरी चुकीचे होत आहे. बिजनेस ट्रीपवर सतत जाने देखील धोक्याची निशाणी असू शकते.

३. पार्टनरने आपल्या मित्रांपासून आणि कुटुंबियांपासून तुम्हाला दूर ठेवणे: तुमच्या सततच्या सांगण्याने देखील तुमचा पार्टनर आपल्या कुटुंबियांसोबत भेटवत नसेल तर समजून जा कि तो आपले नाते सर्वांपासून लपवत आहे. तो कोणालाही न सांगता आपल्या नात्याला संपवू शकतो.

४. आपल्या धोक्यावर पश्चाताप न होणे: जर तुम्ही आपल्या पार्टनरला खोटे बोलताना आणि धोका देताना पकडले आहे आणि तुमचा पार्टनर तरीही पश्चाताप करत नसेल तर याचा अर्थ आहे कि त्याला आपली चूक लक्षात आलेली नाही. पुढे जाऊन तो पुन्हा धोका देऊ शकतो.

५. तुमच्या सोबत वेळ घालवण्याच्या गोष्टीला महत्व न देणे: कोणत्याही नात्यामध्ये जर प्रेम असेल तर ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवणे पसंत करतात. जर तुमचा पार्टनर वेळ घालवत नसेल तर हि चिंता करण्यासारखी बाब आहे कारण त्याला तुमच्या इमोशनची काळजी नाही.

६. तुमच्याप्रती निष्काळजी राहणे: जर तुमचा पार्टनर तुमची काळजी करत नसेल, तुम्हाला काय झाले आहे, तुम्ही कसे आहात, तुम्ही त्याच्यासोबत कम्फ़र्टेबल आहात का नाही. जर या सर्व गोष्टी पार्टनर तुमच्यासोबत विचार करत नसेल तर समजून जा कि त्याला तुमची काहीच चिंता नाही.

७. कामाचे कारण काढून ऑफिसमध्ये वेळ घालवणे: जर तुमचा पार्टनर ऑफिसच्या कामाचे कारण काढून घरी लेट येतो किंवा ऑफिसमध्येच थांबतो. हि प्रक्रिया जर सतत होत असल तर समजून जा कि तुमचा पार्टनर तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे.

८. सोशल मिडिया अकाऊंट तुमच्यासोबत शेयर न करणे: जर तुमचा पार्टनर प्राईव्हसीचे कारण पुढे करून फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मिडिया अकाऊंटचे पासवर्ड तुमच्यापासून लपवत असेल तर समजून जा कि तो तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे.

९. बँकसंबंधी कागदपत्रे तुमच्यापासून लपवणे: जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून क्रेडीट, मोबाईल बँकिंग आणि पासबुक सारखी माहिती तुमच्यासोबत शेयर करत नसेल तर तुम्हाला समजून घ्यायला हवे कि तुमचा पार्टनर तुमच्यावर विश्वास ठेवत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने