प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. त्याची विचारसरणी, राहण्याची पद्धत एकमेकांपासून वेगळी असते आणि आपली इच्छा असून देखील त्याला आपण समजू शकत नाही. पण एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण दुसऱ्याच्या स्वभावाबद्दल जाणून घेऊ शकतो. प्रत्येकाचा जन्मदिवस आणि जन्माचा वार वेगवेगळा असतो.

इथे आपण काही अशा तिथीमध्ये जन्मलेल्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या विशेष तिथीमध्ये जन्मलेल्या असतात आणि भाग्यशाली मानल्या जातात. आठवड्यामधील प्रत्येक वाराला जन्मलेल्या मुलींबद्दल जाणून घ्या स्वभाव कसा असतो.

अशा अनेक विधी असतात ज्याद्वारे व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल माहिती करून घेतले जाऊ शकते. इतकेच नाही तर व्यक्ती कोणत्या वाराला जन्मला होता त्या दिवसानुसार देखील त्याचा स्वभाव जाणून घेतला जाऊ शकतो.

रविवारी जन्मलेल्या मुली दानी, बलशाली, शांत स्वभावाच्या असतात. तथा चतुर आणि क्लेश करणाऱ्या देखील असतात. असे मानले जाते कि सोमवारी जन्मलेल्या मुली रूपवती, शुद्ध मनाच्या, बुद्धिमान, मधुरभाषी, शांती प्रिय, राजयोगवाल्या आणि पुत्रवान असतात.

मंगळवारी जन्मलेल्या मुली कठोर हृदयाच्या, भांडखोर, पातळ आणि खूप शक्तिशाली असतात. बुधवारी जन्म घेणाऱ्या मुली, सरस्वती माताची कृपा प्राप्त करणाऱ्या, कोमल, सद्गुणी आणि अनेक प्रकारच्या कामामध्ये कुशल असतात.

गुरुवारी जन्म घेणाऱ्या मुली शिक्षण, गुण, संपत्ती, शांती प्रिय, धैर्यवान, पुत्रवान आणि सुख प्राप्त करणाऱ्या असतात. शुक्रवारच्या दिवशी जन्मलेल्या मुली चंचल बुद्धीच्या, सुंदर, काळ्या वर्णाच्या आणि सौभाग्यशाली असतात.

शनिवारच्या दिवशी जन्म घेणाऱ्या मुली पातळ, उंच, काळ्या रंगाच्या, चुगलीखोर असतात. कुंडलीच्या इतर ग्रहांच्या स्थितीनुसार, स्त्रियांच्या स्वभावामध्ये बदल देखील होऊ शकतो. ज्योतिषनुसार स्त्रियांच्या स्वभावावर ग्रह नक्षत्रांचा देखील सरळ प्रभाव पडू शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने