भारत एक पारंपारिक देश आहे आणि या देशाची एक वेगळीच विशेषता आहे. या देशाची परंपरा या देशाचा अभिमान आहे. पण काळानुसार पुढे जाताना आपण इतके बदललो आहे कि आपल्या परंपरा पाळण्याचा आपल्याला वेळच मिळत नाही.

आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या लोक कधीच मानत नाहीत आणि कदाचित या कारणांमुळे आपल्याला समस्या आणि दरिद्रताचा सामना करावा लागतो आणि मनुष्य जाणीवपूर्वक या परंपरांचे पालन करत नाही ज्यामुळे तो गरिबीमधून कधीच मुक्त होत नाही. शास्त्रानुसार या सर्व परंपरा मनुष्याला करणे आवश्यक आहे.

गुरुवारी शेविंग करू नये: शास्त्रानुसार गुरुवारचा दिवस गुरुदेवाचा मानला गेला आहे. जे देवतांचे गुरु आहेत. असे म्हंटले जाते कि जो मनुष्य या दिवशी आपले केस कापतो त्या मनुष्याला आयुष्यभर देव साथ देत नाही. या कारणामुळे त्या व्यक्तीची गरिबी कधीच पाठ सोडत नाही. यामुळे शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे कि मनुष्याने कधीच गुरुवारच्या दिवशी आपले केस कापू नयेत किंवा दाढी करू नये. असे केल्यास देव नाराज होतात ज्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो.

नखे कापणे: तुम्ही नेहमी पाहिले असे कि काही लोक असे असतात जे आपल्या दातांनी नखे चघळत असतात आणि काही लोक असे देखील असतात जे आपली नखे रात्री कापणे पसंत करतात. पण शास्त्रामध्ये रात्री नखे कापणे अशुभ मानले जाते. जो मनुष्य रात्री नखे कापतो त्याच्या घरी माता लक्ष्मी कधीच निवास करत नाही.

तुळशीला स्पर्श करणे: शास्त्रानुसार तुळशीला पवित्र मानले गेले आहे आणि यामुळे तुळशीला माताची उपाधी दिली गेली आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप लावले जाते आणि त्याची पूजा केली जाते. पण शास्त्रानुसार असे म्हंटले आहे कि संध्याकाळी दिवा लावल्यानंतर मनुष्याने तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये आणि असे केले तर महापाप समजले जाते यामुळे रात्रीच्या वेळी कधीच तुळशीला स्पर्श करू नये आणि रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत.

संध्याकाळी झाडू मारणे: तुम्ही नेहमी ऐकले असेल कि संध्याकाळी झाडू मारू नये आणि याचा उल्लेख शास्त्रामध्ये देखील आहे. शास्त्रानुसार ज्या घरामध्ये संध्याकाळी झाडू मारण्याचे काम केले जाते त्या घरामध्ये दारिद्रता निवास करते आणि असे केल्याने धनप्राप्ती होऊ शकत नाही.

स्त्रीचा अपमान: शास्त्रामध्ये स्त्रीला देवी मानले गेले आहे. एक स्त्री आईचे रूप असते आणि त्या स्त्रीचा अपमान करणे किंवा तिला वाईट वागणूक देणे मोठे पाप समजले जाते. मग ती तुमची स्वतःची पत्नी असो किंवा मुलगी किंवा दुसरी स्त्री, जो पुरुष असे करतो त्याच्या घरामध्ये दरिद्रता नेहमी बनून राहते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने