सामुद्रिक शास्त्रामध्ये काही अशा निशानांचा उल्लेख केला गेला आहे जे हातावर असणे खूपच शुभ मानले जाते. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हातावर M अक्षर आणि X अक्षरचे निशाण बनलेले असते असे लोक खूपच नशीबवान असतात.

असे निशाण खूपच कमी लोकांच्या हातामध्ये आढळून येते. यामुळे जर तुमच्या देखील हातामध्ये असे निशाण असेल तर समजून जा कि तुम्ही देखील भाग्यवान लोकांपैकीच एक आहात. चला तर मग पाहूयात हातावर असे निशाण असलेल्या लोकांमध्ये कोणते विशेष गुण असतात.

हातावर M अक्षर असणे: हस्तरेषा ज्योतिषनुसार जर व्यक्तीच्या हातावर M अक्षर बनत असेल तर ती व्यक्ती खूपच नशीबवान असते. अशा व्यक्तीला आयुष्याच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये संघर्ष करावा लागतो पण नंतर यांना खूप मोठी सफलता मिळते आणि यामुळे हे खूप श्रीमंत बनतात. हस्तरेषा ज्योतिष नुसार अशा लोकांचे नशीब २१ व्या वर्षानंतर उजळते.

नेतृत्व करण्याची क्षमता असते: ज्या लोकांच्या हातामध्ये M बनलेले असते अशा लोकांमध्ये नेतृव करण्याची क्षमता असते. यांना समाजामध्ये खूप मान-सन्मान मिळतो. M निशाण असणारे लोक खूपच मजबूत असतात आणि जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येचा धैर्याने सामना करतात.

प्रेमामध्ये असतात प्रामाणिक: ज्या लोकांच्या हातामध्ये M अक्षराचे निशाण असते असे लोक प्रेमामध्ये कोणालाही धोका देत नाहीत. असे लोक प्रेमामध्ये खूप प्रामाणिक असतात आणि आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात. अशा लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला जाऊ शकतो.

प्रामाणिकपणे करतात काम: M निशाण असणारे लोक खूप प्रामाणिक देखील असतात आणि आपले प्रत्येक काम ते मनापासून प्रामाणिकपणे करतात. जे काम यांच्यावर सोपवले जाते ते काम पूर्ण करूनच शांत बसतात.

हातावर X अक्षर असण्याचा अर्थ: मनुष्याच्या हातावर X अक्षर असणे देखील खूपच शुभ मानले गेले आहे. ज्या लोकांच्या हातावर X अक्षर बनलेले असते असे लोक खूपच प्रसिद्ध असतात. अशा लोकांना समाजामध्ये मान सन्मान मिळतो.

सफल असतात: X निशाण असणारे लोक जीवनामध्ये खूप सफल होतात. जी वस्तू हे लोक मिळवू इच्छितात त्याला मिळवल्यानंतरच हे लोक शांत बसतात. X अक्षर असणारे लोक स्वप्ने देखील मोठ मोठी पाहतात आणि हि स्वप्ने ते पूर्ण देखील करतात.

आकर्षक प्रतिमा असते: ज्या लोकांच्या हातावर X अक्षराचे निशाण बनलेले असते त्यांची प्रतिमा देखील खूपच आकर्षक असते. हे लोक दिसायला देखील खूपच सुंदर असतात. यामुळे लोक यांच्याकडे लवकर आकर्षित होतात.

मोठ्या पदावर करतात काम: ज्या लोकांच्या हातावर X अक्षराचे निशाण आढळून येते असे लोक राजकारण किंवा इतर मोठ्या कामाशी जोडले गेलेले असतात. जिथे हे मोठ्या पदावर कार्यरत असतात. ज्यामुळे हे लोक ताकदवर देखील असतात.

सहावे इंद्रिय असते खूपच प्रभावी: हातावर X अक्षराचे निशाण असणाऱ्या लोकांचे सहावे इंद्रिय खूपच प्रभावी असते. या लोकांना संकट येण्यापूर्वी आधीच त्याचा आभास होतो. यामुळे अनेकवेळा या लोकांना संकटाचे संकेत आधीच मिळतात ज्यामुळे ते त्यामधून सुखरूप बाहेर पडतात.

प्रत्येकावर प्रेम करतात: हातावर X निशाण असणारे लोक खूपच स्वच्छ मनाचे असतात आणि हे प्रत्येकावर प्रेम करतात. हे लोक वादविवादापासून नेहमी दूर राहतात आणि भांडणे झाल्यास ते सोडवण्यावर जास्त भर देतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने