ज्याने देखील जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. पण काही लोक आपल्या निकटवर्तीयांना लवकर विसरत नाहीत आणि त्यांना नेहमी आठवणीत ठेवतात ज्यामुळे ते लोकत त्यांना स्वप्नामध्ये येऊन दर्शन देतात.

कारण काही लोकांची स्मृती इतकी जास्त प्रभावशाली असते कि त्यांच्या मनामधून अशा गोष्टी निघून जात नाहीत. यामुळे असे लोक मेलेल्या लोकांबद्दल जास्त विचार करतात आणि त्यांची आठवण काढतात. जो व्यक्ती मेला आहे तो देखील स्वप्नामध्ये दिसू लागतो. चला तर जाणून घेऊया मेलेल्या लोकांचे स्वप्नामध्ये येणे कोणते संकेत देते.

मृत लोकांचे स्वप्नामध्ये येण्याचे कारण: जे लोक आपल्या निकटवर्तीयांची जास्त आठवण काढतात आणि त्यांची प्रत्येक आठवण विसरू शकत नाहीत तेव्हा असे होते आणि तो मेलेला निकटवर्तीय स्वप्नामध्ये येऊन नेहमी भेटतो आणि बोलतो देखील.

असे लोक जेव्हा स्वप्नांमध्ये येतात तेव्हा आपल्याला समजते कि ते कसे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते आणि ते आपल्याला समजावतात आणि मार्गदर्शन देखील करतात. त्याचबरोबर येणाऱ्या भविष्याबद्दल देखील आपल्याला कल्पना देतात.

मृत लोकांचा साक्षात्कार: जेव्हा आपला एखादा निकटवर्तीय मरतो तेव्हा आपण त्याला खूप मिस करतो आणि तो आपल्या स्वप्नामध्ये येतो आणि आपल्याला समजावतो. पण आपल्याला हे समजत नाही कि ते आपल्याला स्वप्नामध्ये भेटत आहे कि वास्तवामध्ये. आपल्याला ते आसपास असल्याची जाणीव होते.

आजारी लोक: जर एखाद्या निकटवर्तीयाचा मृत्यू एखाद्या घातक आजाराने झाला असेल तर असे लोक आपल्या स्वप्नामध्ये जेव्हा पाहायला मिळतील तेव्हा ते एकदम स्वस्थ आणि निरोगी दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज पाहायला मिळते.

नेहमी आपल्या प्रियजनांची मदत: काही निकटवर्तीय आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्या त्या प्रिय व्यक्तीशी भेटतात जे या निकटवर्तीयाची मेल्यानंतर मनापासून आठवण काढतात. त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन हर संभव मदत करण्याचा प्रयत्न करतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने