चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी व्हिटॅमिन सीची खूप आवश्यकता असते, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते जे आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर असते. संत्र्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणात असते.

जे त्वचेच्या समस्येमध्ये आराम देम्यासाठी खूपच फायदेशीर असते. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट्स फक्त आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नसतात तर त्वचेला सुंदर आणि तजेलदार बनवण्यासाठी देखील मदत करतात.

संत्र्याच्या सालीने बनलेल्या फेसपॅक वापरल्याने आपल्या चेहऱ्यावरील मुरूम, पिगमेंटेशन आणि ब्लॅकहेड्स कमी होतात. संत्र्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे मुरुमांची समस्या दूर करण्यास मदत करतात.

संत्र्याची पावडर कशी बनवावी: जर तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर बनवायची असेल तर सर्वात संत्र्याची साल चांगल्या प्रकारे वाळवून घ्या. जेव्हा हि साल चांगली वाळेल तेव्हा याला ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. या पावडरचा पॅक बनवण्यासाठी सर्वात पहिला एक चमचा संत्र्याची पावडर घेऊन त्यामध्ये दोन चमचे हळद पावडर टाका.

या पेस्ट मध्ये गुलाबजल देखील मिसळा. यानंतर हे मिश्रण चांगल्याप्रकारे एकजीव करून घ्या, आता तुमचा फेस पॅक तयार आहे. आता याला चेहऱ्यावर लावण्यासाठी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि हि पेस्ट चेहऱ्यावर लावा. हि पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा तुमचा चेहरा एकदम चमकदार दिसेल.

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी संत्र्याच्या सालीचा आणि दुधाचा फेस पॅक: जर तुमचा चेहरा कोरडा पडला असेल तर संत्र्याचा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये एक चमचा दुध घालून याची चांगली पेस्ट बनवून घ्या.

हि पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कमीत कमी १५ मिनिटे चेहऱ्यावर तशीच ठेवा. जेव्हा हे सुकेल तेव्हा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या फेस पॅकचा वापर आठवड्यामधून दोन वेळा करा. यामुळे तुमच्या त्वचेवरील कोरडेपणा दूर होईल त्याचबरोबर तुमची त्वचा तजेलदार बनेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने