राज कपूरचा सर्वात लहान मुलगा आणि रणधीर आणि ऋषी कपूरचे लहान भाऊ राजीव कपूरचे मंगळवार ९ फेब्रुवारी २०२१ रोजी निधन झाले आहे. राजीव कपूर ५८ वर्षांचे होते. अशी बातमी समोर आली आहे कि सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने रणधीर कपूर यांनी लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले. जेव्हा ते हॉस्पिटलला पोहोचले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दिवंगत अभिनेता ऋषी कपूरची पत्नी नीतू कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या बातमीची पुष्टी केली आहे. त्यांनी एका फोटोसोबत “RIP” असे लिहून सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून याची बातमी दिली. आज आपण जाणून घेणार आहोत कि राजीव कपूर यांनी आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबासाठी किती संपत्ती सोडली आहे.

राजीव कपूर एक लोकप्रिय चित्रपट निर्माता, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेताच्या रुपामध्ये प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या पित्याच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये १९८५ मध्ये डेब्यू केला होता. यानंतर ते काही चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी ऋषी कपूरसोबत प्रेम ग्रंथ या चित्रपटामध्ये डायरेक्शन देखील केले होते.

विकिपीडिया, फोर्ब्स, आईएमडीबी आणि इतर माहिती स्रोतांनुसार अभिनेता राजीव कपूर यांची वयाच्या ५९ व्या वर्षी 1-5 मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. त्यांनी एक व्यावसायिक अधिकारी म्हणून इतकी संपत्ती कमावली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने