भारतीय किचनमध्ये ज्याचा सर्वात जास्त वापर केला जातो तो म्हणजे कांदा. कांद्याशिवाय कोणतीही डीश अपूर्ण समजली जाते. कांदा फक्त अन्नाची चवच वाढवत नाही तर यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आणि प्रोटेक्टिव कंपाउंड असतात जे अनेक प्रकारच्या आजाराशी लढण्यास मदत करतात.

बाजारामध्ये आपल्याला जास्तकरून लाल आणि पांढरा कांदा पाहायला मिळतो. तसे तर दोन्ही कांद्यांचे वेगवेगळे फायदे असतात. पण आरोग्याच्या दृष्टीने पांढरा कांदा खूपच फायदेशीर मानला गेला आहे. अशामध्ये आजच्या या पोस्टमध्ये आपण पांढऱ्या कांद्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

पुरुषांसाठी रामबाण: वी’र्यवृद्धिसाठी पांढरा कांदा वापरला जातो. मधासोबत याच्या सेवनाने याचा डबल फायदा मिळतो. कांद्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स नैसर्गिक रूपाने स्प’र्म वाढविण्यास मदत करतात.

हृदय ठेवते स्वस्थ: पांढऱ्या कांद्यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट आणि कंपाऊंड सूज कमी करण्यासोबत ट्राइग्लिसराइड्सची लेवल कमी करते. ट्राइग्लिसराइड्स कमी झाल्याने कोलेस्ट्रॉल लेवल कमी होतो ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहते.

पाचन तंत्र मजबूत करते: पांढऱ्या कांद्यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या पोटाची विशेष रूपाने काळजी घेतात. कांद्यामध्ये प्रीबायोटिक इनुलिन आणि फ्रुक्टो ओलिगोसैचेराइड्स भरपूर प्रमाणात असतात आणि जर याचे नियमित सेवन केले तर पोटामधील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते.

कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म: पांढरा कांदा एलियम परिवारच्या भाज्यामध्ये येते, ज्यामध्ये सल्फर कंपाउंड आणि फ्लेवोनॉयड एंटीऑक्सीडेंट्स आढळतात, जे कर्करोगाशी लढण्यास व्यक्तीची मदत करतात. कांद्यामध्ये असलेले सल्फर, क्वेर्सिटिन फ्लेवोनॉयड आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म ट्यूमर वाढीस प्रतिबंध करतात.

रक्त पातळ करते: पांढरा कांदा रक्त पातळ करण्यास देखील व्यक्तीची मदत करतो. यामध्ये फ्लेव्होनॉइड आणि सल्फरसारखे काही असे एजंट्स असतात जे रक्त पातळ करण्यास व्यक्तीची मदत करतात.

ब्लड शुगर लेवल कंट्रोल करते: क्रोमियम आणि सल्फर सारखे तत्व पांढऱ्या कांद्यामध्ये असतात जे ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करतात. डायबिटीजने त्रस्त असलेल्या लोकांनी आपल्या आहारामध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश जरूर करावा. वास्तविक कांद्यामध्ये आढळणारे कंपाउंड जसे क्वेर्सिटिन आणि सल्फर मध्ये अँटी-डायबिटिक गुण असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने