हिंदू धर्मामध्ये वास्तूचे खास महत्व मानले गेले आहे. विशेष रूपाने पूजाघराबद्दल वास्तूचे नियम सांगितले गेले आहेत. पूजेच्या घरामध्ये काय असावे आणि काय असू नये याबद्दल देखील वास्तूमध्ये बरेच काही सांगितले गेले आहे. पूजेच्या घरामध्ये सामान्यतः आपण अशा वस्तू ठेवतो ज्या पूजेमध्ये वापरल्या जातात.

पण तरीही अशा काही वस्तू असतात ज्या भलेहि वापरल्या जात नाहीत पण पूजेच्या घरामध्ये त्या असणे अवश्यक मानले जाते. मान्यता अशी आहे कि या वस्तू पूजेच्या घरामध्ये ठेवल्याने घरामध्ये बरकत येते आणि धनसंपत्तीची देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते.

गंगाजल: हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार माता गंगाला प्राणदायिनी आणि जीवनदायिनी मानले गेले आहे. यामुळे गंगाजलला विशेष महत्व आहे. यामुळे गंगाजल छोट्याशा पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये जरूर ठेवावे आणि दररोज याची पूजा करावी. पौर्णिमा किंवा एकादशी सारख्या शुभ दिवशी पूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरामधील नकारात्मक शक्ती समाप्त होते.

मोरपंख: आपल्या संस्कृती आणि पौराणिक मान्यतांमध्ये मोरपंखाला श्रीकृष्णाचा अंश मानले गेले आहे. मान्यता अशी आहे कि पूजेच्या घरामध्ये मोरपंख जरूर असायला हवा. पूजेच्या घरामध्ये मोरपंख असल्यास घरावर कोणाचीही वाईट नजर पडत नाही. यासोबत काही लोक हे देखील मानतात कि पूजेच्या घरामध्ये मोरपंख ठेवल्याने घरामध्ये किडे देखील येत नाहीत.

गौमूत्र: गायीला हिंदू धर्मामध्ये देवीचा दर्जा दिला गेला आहे. हि देखील मान्यता आहे कि गायीमध्ये ३३ कोटी देव निवास करतात. गौमूत्रचा वापर पूजेमध्ये केला जातो आणि त्याचबरोबर गायीच्या शेणीला देखील पूजेमध्ये जरुरी मानले गेले आहे.

शंख: पूजेच्या ठिकाणी शंख असणे देखील जरुरीचे मानले गेले आहे. दक्षिणावर्ती शंखाच्या ध्वनीने आपल्या घरामधील सर्व प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी नाहीश्या होतात आणि सगळीकडे भक्तीमय वातावरण होते. गुरुवारच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखाणे विष्णूदेवाची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्ती होते.

शालिग्राम: शालिग्रामदेखील पूजेमध्ये जरुरीचे मानले गेले आहे आणि दररोज तुळशी मिश्रित पाण्याने त्याला स्नान घातले पाहिजे. असे केल्याने विष्णूदेवाच्या सर्व अवतारांचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्या घरामध्ये दररोज शालिग्रामची पूजा केली जाते त्या घरामध्ये दरिद्रता कधीच येत नाही आणि माता लक्ष्मी सदैव निवास करून राहते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने