मध्यप्रदेशच्या श्योपुर जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचे पाच गावे अशी आहेत जिथे मुले जन्माला आल्यानंतर लग्न निश्चित होते. बंजारा समाज मागास असूनदेखील सरकार द्वारे बाल विवाह रोखण्यासाठी बनवलेल्या कायद्याचे पालन करते. भलेहि मुले जन्माला आल्यानंतर हि प्रथा पूर्ण करत लग्न निश्चित केले जाते, पण मुले मोठी झाल्यानंतरच लग्न केले जाते.

लग्न ठरल्यानंतर मुलगा किंवा मुलींच्या कडून लग्नाला नकार आल्यास त्याला याबद्दल ९५ हजार रुपये दंड केला जातो. यापेक्षाची रोचक बाब हि आहे कि मुलगा किंवा मुलगी घरातून पळून गेल्यास किंवा दुसऱ्याशी संबंध ठेवल्यास त्यांना अडीच लाखाचा दंड केला जातो.

बंजारा समाजाचे हे पाच गाव रामबाड़ी, भीकापुर, हनुमानखेड़ा, मल्होत्रा आणि सौभागपुरा अशी आहेत. हि गावे जवळ जवळ चार किलोमीटर भागामध्ये जवळ जवळ वसली आहेत आणि श्योपुर जिल्ह्यापासून १५ किलोमीटरच्या अंतरावर आहेत.

या गावामधील मुलगा किंवा मुलगी असो या पाच गावां व्यतिरिक्त यांचे लग्न कुठेच ठरवले जात नाही. यामुळे प्रत्येक कुटुंबाला माहिती असते कि कोणाला किती मुले आहेत. कोणाच्या इथे कधी मुल जन्माला येणार आहे. या गावांमध्ये जितके देखील लग्न झाले आहेत, यामध्ये कोणाचे लग्न तीन दिवसाच्या वयामध्ये तर कोणतेच चार तर कोणाचे १० दिवसाच्या वयामध्ये निश्चित झालेले असते.

जर एखाद्या कारणामुळे लग्न मोडायचे झाले तर याचा निर्णय पंचायत घेते. पंचायतसमोरच लग्न मोडण्याच्या दंडानुसार दुसऱ्या पक्षाला रोख रक्कम दिली जाते. सौभागपुरामधील ठाकरी बंजाराचा मुलगा बल्लूचे लग्न पाच दिवसाच्या वयामध्ये सौभागपुरामधील गुलाब बंजाराची मुलगी नानू सोबत निश्चित झाले होते.

पण मोठे झाल्यानंतर बल्लूने नानू सोबत लग्न करण्यास नकार दिला. यानंतर याचा निर्णय पंचायतीमध्ये करण्यात आला. ज्यामध्ये पंचायतीने हा निर्णय घेतला कि बल्लूच्या वडिलांनी ९५ हजार रुपये रोख दंड मुलीच्या कुटुंबियांना द्यावे.

याचप्रकारे सौभागपुरा मधील गोली बंजाराचा मुलगा राकेशचे लग्न घनश्याम बंजाराची मुलगी फुलवतीसोबत ठरले होते. नंतर राकेशला फूलवती पसंत आली नाही. यानंतर हे लग्न पंचायतीमध्ये मोडले गेले आणि २५ हजार रुपये दंड आकारण्यात आला.

५ वर्षांपूर्वी सुरु झाली दंड प्रथा: बंजारा समाजामध्ये मुलगा किंवा मुलगीने घरातून पळून गेल्यास किंवा लग्न ठरल्यास आणि मुलगा-मुलगीसोबत संबंध बनवल्यास किंवा घरातून पळून घेल्यास दंड वसूल करण्याची प्रथा तशी तर खूपच जुनी आहे.

लहानपणी झालेले लग्न मोडल्यास दंड वसूल करण्याची प्रथा पाच वर्षांपूर्वी सुरु झाली होती. वास्तविक लहानपणी ठरलेली लग्ने मोडण्याच्या घटनांमुळे बंजारा समाज त्रस्त होता. समाजामध्ये लहानपणी ठरलेली लग्ने वाचवण्यासाठी ९५ हजार रुपये दंड आकारण्याची प्रथा सुरु करण्यात आली, पण तरीही यावर आळा बसला नाही.

प्रथा नाकारल्यास दंड: जर एखादी विवाहित महिला किंवा पुरुष घरातून पळून जाऊन एखाद्या दुसऱ्या पुरुषासोबत किंवा महिलेसोबत संसार थाटत असेल तर त्याला खूप नुकसान सोसावे लागते. असे करणाऱ्याला दीड ते अडीच लाख रुपये दंड भरावा लागतो.

इतकेच नाही तर समाजाच्या व्यवस्थेवर कलंक लावणाऱ्या अशा महिला किंवा पुरुषाचे घर देखील उध्वस्त केले जाते. बंजारा समाजाच्या एका युवकाने पत्नीला सोडून दुसऱ्या युवतीसोबत लग्न केले. यानंतर समाजातील लोकांनी त्या युवकाचे घर उध्वस्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने