हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे महत्व आहे. प्रत्येक सण कोणत्याना कोणत्या प्रकारे वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. याच सणांपैकी एक आहे महाशिवरात्री. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा मिलन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मान्यतानुसार शिवरात्रीच्या दिवशीच माता पार्वती आणि भगवान शंकराचा विवाह झाला होता. या दिवशी भगवान शंकराची पूर्ण विधीद्वारे पूजा केली जाते आणि व्रत उपवास करण्याची परंपरा आहे. यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव ११ मार्च २०२१ (गुरुवारी) साजरा केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया महाशिवरात्रीची तिथी, पूजा विधी आणि पूजेचा शुभ मुहूर्त.

महाशिवरात्रीची तिथी

हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीचा उत्सव दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षच्या त्रयोदशीला साजरा केला जातो. हा उत्सव भगवान शंकर आणि पार्वती माताचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो. या वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षची त्रयोदशी तिशी ११ मार्च (गुरुवार) ला येत आहे. यामुळे हा उत्सव त्याच दिवशी साजरा केला जाणार आहे.

महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त

महाशिवरात्री त्रयोदशी तिथी – ११ मार्च २०२१ (गुरुवार) चतुर्दशी तिथि प्रारंभ – ११ मार्च दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल. चतुर्दशी तिथि समाप्त – १२ मार्च दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी निशिता वेळ – ११ मार्च रात्री १२ वाजून ६ मिनिट ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत.

पहिला प्रहर – ११ मार्च संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपासून ते ९ वाजून २९ मिनिटांपर्यंत दुसरा प्रहर ११ मार्च रात्री ९ वाजून २९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत तिसरा प्रहर – ११ मार्च रात्री १२ वाजून ३१ मिनिटांपासून ते ३ वाजून ३२ मिनिटांपर्यंत चौथा प्रहर – १२ मार्च सकाळी ३ वाजून ३२ मिनिटांपासून ते सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत शिवरात्री व्रत पारण वेळ – १२ मार्च सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपासून ते संध्याकाळी ३ वाजून २ मिनिटांपर्यंत

शिवपूजा वेळ

मान्यतानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शुभ काळा दरम्यानच भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करावी. असे केल्याने पूजेचे संपूर्ण फळ मिळते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री चार वेळा शिव पुजेची परंपरा आहे आणि असे मानले जाते कि या दिवशी या वेळा पूजा केल्याने सर्व पाप आणि कष्टांचे निवारण होते आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते.

कसे करावे महाशिवरात्री व्रत

महाशिवरात्री व्रत त्रयोदशी तिथीला सुरु होईल ज्यामध्ये पूर्ण दिवस उपवास ठेवला जाईल. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त भगवान शंकराची पूजा करतात आणि आपले व्रत पूर्ण करण्यापूर्वी भोलेनाथाकडून आशीर्वाद मागतात. हिंदू शास्त्रानुसार चतुर्दशीला रात्रीच्या दरम्यान चार वेळा महाशिवरात्री पूजा केली जाते. या चार वेळांना चार प्रहर म्हणून देखील ओळखले जाते. असे मानले जाते कि या वेळांदरम्यान पूजा केल्याने व्यक्तीला आपल्या मागील पापांमधून मुक्ती मिळते आणि मोक्षचा आशीर्वाद मिळतो.

शिव पूजा रात्री दरम्यान करणे अनिवार्य मानले जाते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्दशी तिथी समाप्त होण्यापूर्वी सुर्योदया नंतर या व्रतचे पारण करावे. जर तुम्ही उपवास करता तर पूर्ण दिवस फलाहार करावा आणि मिठाचे सेवन करू नये. जर एखाद्या कारणामुळे मिठाचे सेवन करावे लागले तर सेंधा मीठचे सेवन करावे.

कसे करावे शिव पूजन

महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि दररोजची कामे पूर्ण करून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. पूजेच्या ठिकाणची चांगली स्वच्छता करून घ्या आणि सर्व देवीदेवतांना स्नान घालावे. यानंतर ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करून घ्यावे.

भगवान शंकर आणि माता पार्वतीची प्रतिमा साफ चौकावर स्थापित करून पंचामृताचे स्नान घालावे. शिवलिंगला देखील स्नान घालून बेलपत्र, धोतरा, फळ, मिठाई, गोड पान इ. अर्पण करावे. भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावावा आणि फळांचा नैवैद्य दाखवावा. पूर्ण दिवस व्रताचे पालन करावे. दिवसभर भगवान शंकराचे ध्यान करावे आणि स्तुती करावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने