घरामध्ये साफसफाईचे विशेष महत्व आहे. बहुतेक घरामध्ये महिलाच झाडू मारतात पण तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल कि घरामध्ये लहान मुले देखील झाडू मारायला सुरुवात करतात. याला आपण नेहमी दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहिती आहे का कि लहान मुल जर घरामध्ये झाडू मारत असेल तर यामागे कोणते कारण असते.

जर घरामधील लहान मुल हातामध्ये झाडू घेऊन झाडू मारत असेल तर समजून जा कि तुमच्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत. घरामध्ये लहान मुलाने झाडू मारणे आपल्यासाठी शुभ असते. याचा अर्थ असा होतो कि घरामध्ये धनाचे आगमन होणार आहे.

याशिवाय देखील इतर अनेक झाडू संबंधी गोष्टी आहेत

अनेक वेळा जेव्हा तुम्ही घर किंवा दुकान खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा त्यानंतर आपण त्याची सफाई करू लागतो. जर यादरम्यान तिथे जर एखादी मेलेली पाल दिसली तर असे घर किंवा दुकान खरेदी करू नये, कारण हा आपल्यासाठी अपशकून असतो. अशा घरामध्ये तुम्ही राहायला सुरुवात केली तर घरामध्ये नेहमी दुखाचे वातावरण राहते.

जर तुम्ही त्या घराचे पैसे दिले असतील आणि तुम्हाला त्या घरामध्ये राहायचेच असेल तर त्यामध्ये जाण्याअगोदर सर्वात पहिला पूजा-पाठ करून घ्यावी. सर्वात महत्वाची गोष्ट हि आहे कि झाडूला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते कारण ज्या घरामध्ये साफसफाई होते तिथेच माता लक्ष्मीचा निवास असतो.

जर तुम्ही झाडूला पाय मारत असाल तर हे अशुभ असते. याशिवाय झाडूला ओलांडणे देखील अशुभ मानले जाते. या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवाव्यात. या गोष्टी जर नेहमी लक्षात ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत.

प्रत्येक घरामध्ये झाडू मारला जातो पण झाडू मारण्याची देखील योग्य वेळ असते. साफसफाई सकाळसकाळी केली जाते. पण काही लोक संध्याकाळी झाडू मारण्यास सुरुवात करतात जे एकदम चुकीचे आहे. संध्याकाळी कधीच झाडू मारू नये. संध्याकाळी झाडू मारल्यास धन संपत्तीची देवी माता लक्ष्मी नाराज होते.

ज्या घरामध्ये संध्याकाळी झाडू मारला जातो त्या घराच्या दरवाजामधून माता लक्ष्मी परत जाते. प्राचीन काळापासूनच सकाळी झाडू मारण्याची प्रथा आज देखील चालत आली आहे. पण काही लोक संध्याकाळी झाडू मारतात आणि आपल्या घराच्या बरबादीचे स्वत:च कारण बनतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने