लग्न आयुष्यामधील सर्वात मोठा निर्णय असतो. अशामध्ये जर तुम्ही लग्न करणार असाल तर स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. असे होऊ नये कि तुम्ही घरच्यांच्या दबावाखाली किंवा मित्रांच्या सल्ल्याने लवकर लग्न करून मोकळे होऊ इच्छिता.

लग्न एक मोठे जबाबदारीचे काम आहे. एका नवीन व्यक्तीला किंवा नवीन घरामध्ये अॅडजस्ट होणे काही सोपे काम नसते. यामुळे लग्नाअगोदर स्वतः खाली दिलेले प्रश्न एकदा अवश्य विचारावेत. ज्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये नेहमी सुखी राहाल.

तुम्ही दबावाखाली लग्न करत आहात का? जर असे असेल तर तुमचा हा निर्णय वेळीच बदला. कारण दबावाखाली किंवा जबरदस्तीने केलेले लग्न कधीच सफल होत नाही. अशामध्ये दोन्ही कुटुंब बरबाद होऊ शकतात.

तुम्ही जबाबदारी घेऊ शकता का? लग्न मोठे जबाबदारीचे काम आहे. मुलगा असो किंवा मुलगी सर्वांचे लग्नानंतर आपली काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या असतात. यामुळे स्वतःला या जबाबदाऱ्या घेण्यासाठी तयार करा त्यानंतर लग्नासाठी होकार द्या.

तुम्ही मानसिक आणि शारीरिक रूपाने तयार आहात का? लग्नाचे योग्य वय नसणे किंवा मानसिक रूपाने यासाठी तयार नसणे हि देखील एक समस्या बनू शकते. यासाठी पहिला स्वतःला मानसिक आणि शारीरिक रूपाने तयार करा आणि त्यानंतर लग्नासाठी उभे राहा.

लग्न का करू इच्छिता? जर तुम्ही एक मुलगा असाल तर तुम्हाला घरामध्ये एक कामवाली पाहिजे का? किंवा तुमचा एकटेपणा दूर करायचा आहे का? जर मुलगी असाल तर तुम्ही श्रीमंत मुलासोबत लग्न करून राहिलेले आयुष्य आरामात घालवू इच्छिता का? किंवा तुम्ही खरे प्रेम करता का? सर्वात पहिला लग्न करण्याचा हेतू स्पष्ट करा आणि त्यानंतरच लग्न करा.

तुम्ही नवीन लोकांसोबत अॅडजस्ट करून घेऊ शकता का? प्रेम एक वेगळी गोष्ट आहे पण जेव्हा नवीन लोकांसोबत एका छताखाली २४ तास राहावे लागते तेव्हा हि बाब वेळी होते. इथे प्रेमापेक्षा अॅडजस्टमेंट चालते. नवीन जागी नवीन लोकांच्या सवयींने त्रास होऊ शकतो किंवा आपले राहणीमान किंवा सवय बदलू शकत नाही तेव्हा तुमचे लग्न योग्य करणे नाही.

तुम्ही जुन्या लव्ह अफेयरला विसरू शकता का? लग्नामध्ये प्रामाणिकपणा सर्वात मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही जुन्या प्रेमाला विसरू शकत नाही किंवा कोणत्याही एका पार्टनरसोबत संपूर्ण लाईफ घालवू शकत नाही तर लग्न करून दुसऱ्याचे आयुष्य बरबाद करू नये.

लग्न तुमच्या भविष्याचे प्लानिंग तर बिघडवणार नाही ना? लग्नानंतर घर आणि मुलांची जबाबदारी देखील आपल्यावर येते. अशामध्ये जर तुम्ही लग्नानंतर शिक्षण, नोकरी किंवा करियर बद्दल विचार करत असाल तर हे सुनिश्चित करा कि लग्नानंतर यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये.

तुम्ही आर्थिक रूपाने सक्षम आहात का? लग्नानंतर लाईफ थोडी खर्चिक देखील होते. पत्नी मुले येताच खर्च देखील वाढतो. अशामध्ये लग्नाअगोदर आपला बँक बॅलन्स मजबूत करून घ्या. त्याचबरोबर तुमच्याकडे एक कायमस्वरूपी इनकम देखील असणे अवश्यक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने