आपल्या सर्वांच्या घरामध्ये दह्याचा नेहमी वापर केला जातो. हे देखील सत्य आहे कि दही आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जर दररोज एक वाटी दही खाल्ले तर आपली पाचन क्रिया देखील चांगली राहते. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि विटामिन असतात.

भारताच्या परंपरेबद्दल बोलायचे झाले तर लोक घरामध्ये अनेक वेळा दह्याचा प्रयोग करत आले आहेत. दह्याचा वापर फक्त खाण्यासाठीच नाही तर शुभ कार्यामध्ये देखील केला जातो. इतकेच नाही तर तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल कि एखादे महत्वाचे काम करण्यास जाण्यापूर्वी व्यक्तीला दही-साखर खायला दिले जाते.

इतकेच नाही तर दही आपल्या आरोग्यासाठी देखील खूप लाभदायक आहे. हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर आपल्याला सुंदर दिसण्यासाठी देखील मदत करते. दह्याचा वापर आपण ब्यूटी मास्क म्हणून देखील करू शकतो. दह्याची सर्वात खास बाब हि आहे कि हे स्वस्त तर आहेच त्याचबरोबर सहजपणे उपलब्ध होते.

पण हि गोष्ट देखील सत्य आहे कि दह्यामध्ये बरेच बॅक्टेरिया देखील आढळतात. मेडिकल सायंसनुसार जर एक कप दह्यामधील जीवाणूंची गणना केली तर त्यामध्ये करोडो जीवाणू आढळतील वास्तविक दह्यामध्ये छोटे-छोटे करोडो संख्येमध्ये बॅक्टेरिया असतात. इतकेच नाही तर हे बॅक्टेरिया फक्त लेंसद्वारे पाहिले जाऊ शकतात.

हे बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. जर आपण गोड दही खाल्ले तर हे बॅक्टेरिया आपल्यासाठी फायदेशीर सिद्ध होतात. पण तुम्हाला हे माहिती नसेल कि जर तुम्ही दह्यामध्ये चिमुटभर मीठ मिसळले तर दह्यामधील सर्व बॅक्टेरिया मरून जातील. जर तुम्ही १०० किलो दह्यामध्ये चिमुटभर जरी मीठ टाकले तर दह्यामधील सर्व बॅक्टेरियल गुणधर्म नष्ट होतील. यामुळे दह्याचे सेवन करताना त्यामध्ये साखर किंवा गुळ मिसळून खाल्ले पाहिजे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने