आपण प्रेशर कुकरचा वापर नेहमी अन्न शिजवण्यासाठी करतो. ज्यामुळे जेवण देखील लगेच तयार होते आणि इंधन बचत देखील होते. जर तुम्ही देखील असे करत असाल तर अलर्ट व्हा. कारण तुम्हाला माहिती नाही कि थोड्याशा इंधन बचतीसाठी आपल्या आरोग्याशी खेळत आहोत.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार: प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी जितके चांगले असते तितकेच जास्त आपल्या आरोग्यासाठी खराब देखील असते. प्रेशर कुकरमध्ये काही पदार्थ शिजवून त्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यावर वाईट प्रभाव टाकू शकते. चला तर आज आपण जाणून घेऊया कुकरमध्ये कोणते पदार्थ शिजवले पाहिजेत आणि कोणते नाही.

कुकरमध्ये भाज्या शिजविणे: जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या भाज्या शिजवत असाल तर हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण जेव्हा तुम्ही भाज्या कुकरमध्ये शिजवता तेव्हा भाज्यामधील पोषक तत्व बाहेर पडू शकत नाहीत. जर तुम्ही या भाज्या एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा कडई मध्ये शिजवत असाल तर त्या जास्त शिजल्यास भाज्यांमधील पोषक तत्व निघून जातात.

कुकरमध्ये स्टार्च समृद्ध पदार्थ शिजविणे: जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये स्टार्चने समृद्ध खाद्य पदार्थ शिजवत असाल तर हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. कारण असे पदार्थ कुकरमध्ये बनवल्याने अॅपक्रिलामाइड नावाचे एक रसायन तयार होते जे आरोग्यासाठी हानिकारक असते.

याचा वाईट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. ज्यामुळे आपल्याला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता वाढते यामुळे प्रेशर कुकरमध्ये स्टार्चने समृद्ध पदार्थ जसे भात, पास्ता, बटाटे इत्यादी पदार्थ शिजवून खाऊ नयेत.

कुकरमध्ये चिकन आणि मटन शिजविणे: चिकन आणि मटन प्रेशर कुकरमध्ये शिजवणे योग्य असते. चिकन आणि मटन कुकरमध्ये शिजवल्यास ते चांगल्या प्रकारे शिजते आणि आपल्या पचवण्यास देखील सोपे जाते.

जर आपण याला मोकळ्या भांडयामध्ये शिजवले तर याला शिजण्यास वेळ देखील जास्त लागतो आणि हे चांगल्या प्रकारे शिजत देखील नाही. ज्यामुळे आपल्याला पचवण्यास अवघड जाते आणि आपले आरोग्य देखील खराब होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने