कॉकरोच कसे पळवावे: बहुतेक महिला कॉकरोचला खूप घाबरतात. कॉकरोचला घरामधून पळवून लावण्यासाठी तुम्ही लसून-कांदा आणि काळ्या मिरचीला समान प्रमाणामध्ये घेऊन याची पेस्ट बनवून घ्या. आता हि पेस्ट पाण्यामध्ये मिसळून याचे मिश्रण बनवून घ्या.

हे मिश्रण एका बाटलीमध्ये घाला आणि ज्या ठिकाणाहून कॉकरोच अधिक येतात त्या ठिकाणी हे मिश्रण टाका. जर तुम्ही हा उपाय काही दिवस नियमितपणे केला तर तुम्हाला हा परिणाम लवकरच पाहायला मिळेल आणि कॉकरोच येणे बंद होईल.

उंदीर पळवून लावण्याचा उपाय: जर तुमच्या घरामध्ये उंदरांमुळे त्रस्त असाल तर पेपरमिंटचे काही तुकडे घरामधील कोपऱ्यामध्ये ठेवा. उंदीर पेपरमिंटच्या वासाने पळून जातात. असे केल्याने ते पुन्हा किचनमध्ये दिसणार नाहीत आणि जर तुम्हाला वाटत असेल कि उंदीर पुन्हा येत आहेत तर आठवड्यामधून ३-४ दिवस सतत करत राहा. असे केल्याने उंदीर कायमचे घरामधून निघून जातील.

अशी मिळवा माश्यांपासून सुटका: माश्यांपासून नेहमी लोक त्रासलेले असतात. या माश्या घाणीवर बसतात आणि नंतर आपल्या अन्नावर बसतात. इतकेच नाही तर ह्या माश्या दिवसा झोपू देखील देत नाहीत. तर आता काळजी करू नका. माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सर्वात पाहिला या गोष्टीवर लक्ष द्या कि घरचे सर्व दरवाजे बंद असावेत.

आणि घराची साफसफाई ठेवावी. याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कडक वासाच्या तेलामध्ये थोडा कापूस भिजवून घ्या आणि याला दरवाजावर ठेवा. असे केल्यास माश्या घरामधून निघून जातील कारण माश्या कडक वासापासून दूर पळून जातात.

ढेकुण पळवून लावल्याचे उपाय: तुम्ही सहजरित्या घरामधील ढेकुण नष्ट करू शकता. यासाठी कांद्याचा रस काढून घ्या आणि याला स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून याला घरामध्ये स्प्रे करा कांद्याच्या रसामुळे ढेकुण मरून जातात.

अशा पळवून लावा पाली: घरामधील पाली पळवून लावण्यासाठी तुम्ही मोराचे तीन-चार पंख घरातील भिंतीवर लावून ठेवा. मोर पालींना खातात यामुळे पाली मोराच्या पंखापासून दूर पळून जातात. हे सरळ आणि घरगुती उपाय वापरल्याने तुम्ही समस्यांपासून सहजपणे सुटका मिळवू शकता.

मच्छर कसे पळवून लावावे: एक छोट्या लॅम्पमध्ये रॉकेलमध्ये ३० थेंब कडुलिंबाचे तेल टाका. दोन कापराच्या वड्या बारीक करून २० ग्रॅम नारळाच्या तेलात टाकून याचे मिश्रण बनवून घ्या. याला जाळल्यानंतर घरामधील सर्व मच्छर पळून जातील. जेव्हापर्यंत हे लॅम्प जळत राहते तोपर्यंत घरामध्ये मच्छर येत नाहीत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने