आजच्या आधुनिक जीवनामध्ये लोकांचे राहणीमान असे झाले आहे कि लोक वास्तुशास्त्राकडे लक्ष देत नाहीत. वास्तूशास्त्राचे महत्व आपल्या वेदपुराणामध्ये सांगितले गेले आहे. जर आपण वास्तूशास्त्राचा उपयोग केला तर घरामध्ये पॉजिटिविटी बनून राहते.

घरामध्ये सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी वास्तूशास्त्राचा प्रयोग खूप महत्वाचा असतो. घरामध्ये वस्तूंच्या ठेवण्यामध्ये आणि त्यांच्या निवडीमध्ये अनेकप्रकाच्या चुका होतात ज्यामुळे घरामध्ये निगेटिविटी बनून राहते. हि निगेटिविटी आपल्याला मानसिक, शारीरक आणि आर्थिक रूपाने त्रासदायक ठरू शकते.

आज आपण वास्तूशास्त्रासंबंधी काही अशा वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे घरामध्ये सुख शांती टिकून राहते. या टिप्स अंथरूणा संबंधी आहेत. जेव्हा आपण अंथरूणावर झोपतो तेव्हा जवळपास कोणत्या वस्तू असायला हव्यात आणि कोणत्या नाही याबद्दल जाणून घेणार आहोत.

१. बूट-चप्पल: बऱ्याचवेळा पाहायला मिळते कि लोक जागेच्या कमतरतेमुळे बेडच्या खालीच बूट-चप्पल ठेवतात. परंतु असे करू नये. बेडच्या खाली चप्पल ठेवण्याची सवय सुधारली पाहिजे. असे म्हंटले जाते कि बूट-चप्पल मध्ये खूप नकारात्मक एनर्जी असते. जर तुम्ही याला बेडच्या खाली ठेवले तर झोपल्यानंतर हि नकारात्मक एनर्जी आपल्यामध्ये समाहित होऊ शकते जे पुढे चालून आपल्यासाठी नुकसानदाय ठरू शकते.

२. पाणी: पाणी पिण्यासाठी बेडपासून दूर जावे लागू नये म्हणून लोक बेडच्या आसपास पाणी ठेवणे प्रेफर करतात. पण असे करू नये कारण यामुळे चंद्र प्रभावित होतो. यामुळे मनोरोग सारख्या समस्या जन्म घेतात. याशिवाय झोपतेवेळी पाण्यामध्ये असलेले एलिमेंट आपल्या झोपेमध्ये बाधा आणू शकतात.

३. भांडी: वास्तूशास्त्रानुसार ज्या अंथरूणावर तुम्ही झोपता त्यावर कधी भांडी ठेऊ नयेत. काही लोक असे म्हणतात कि प्लास्टिक आणि काचेची भांडी ठेवल्याने काही होत नाही पण बेडवर कोणत्याही प्रकारची भाडी ठेऊ नयेत.

४. पायपुसणे: बहुतेकवेळा पाहायला मिळते कि लोक बेडच्या खाली पायपुसणे ठेवतात. बेडवर जाण्यापूर्वी लोक पायपुसणेला पाय पुसतात. पायपुसणे नेहमी बेडच्या दूरच ठेवले पाहिजे बेडच्या खाली नाही. बेडच्या खाली पायपुसणे ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक उर्जा येते.

५. मोबाईल: नेहमी आपण रात्री मोबाईल वापरत झोपी जातो आणि मोबाईल पलंगावरच राहतो. अंथरुणावर किंवा उशाला फोन ठेवणे वास्तूशास्त्रानुसार चुकीचे आहे. याशिवाय अंथरुणावर कोणत्याही प्रकारचे गॅझेट ठेऊ नये. जर तुम्हाला मोबाईलवर अलार्म लावून ठेवायचा असेल तर याला अंथरुणापासून इतके दूर ठेवा कि तिथपर्यंत तुमचा हात पोहोचू नये.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने