आयुष्यामध्ये सफल होणे आणि सुखी राहण्यामध्ये भाग्य महत्वाची भूमिका बजावते. तथापि काही लोकांचे नशीब इतके वाईट असते कि ते जे कोणतेही काम करतात त्यामध्ये त्यांच्या हाती कधीच सफलता लागत नाही. अशा भाग्यहीन पुरुषांबद्दल समुद्राशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. यामध्ये सांगितले गेले आहे कि भाग्यहीन पुरुषांमध्ये कोणकोणते शारीरिक लक्षणे पाहायला मिळतात.

ज्या पुरुषांचे अंगठे अधिक मोठे असतात त्याचे भाग्य कधीच साथ देत नाही. असे लोक चांगल्या नशिबासाठी नेहमी तरसत राहतात. यांना आपल्या दुर्देवी नशिबासोबत जगावे लागते. ज्या पुरुषांचे पाय पांढरे, कोरडे, वाकडे नखे आणि असमान असतात त्यांना लाईफमध्ये अनेक वाईट परिस्थितींचा सामना करावा लागतो. खासकरून यांना धनासंबंधी समस्या येतात.

ज्या पुरुषांच्या मांडीवर रोम नसतात असे लोक नशिबाचा लाभ घेऊ शकत नाहीत. भाग्य यांच्या जवळपास देखील भटकत नाही. ज्या पुरुषांच्या गुडघ्यामध्ये अधिक मास नसते ते देखील आपल्या नशिबाचा लाभ घेऊ शकत नाहीत. या पुरुषांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी मेहनत करावी लागते. सुखासाठी यांचे भाग्य यांना नेहमी तरसवत ठेवते.

ज्या पुरुषांची नाभी छोटी असते अशा पुरुषांना जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. भाग्य यांच्यापासून नेहमी दूरच राहते. ज्या पुरुषांची हनुवटी लहान आणि चपटी असते असे लोक जीवनामध्ये धनासंबंधित प्रकरणांमध्ये नेहमी मागेच राहतात. पैसा यांना मेहनतीने मिळतो नशिबाने नाही. तर वर आलेले हनुवटी असणारे लोक नेहमी पैशांमध्ये खेळतात.

ज्या पुरुषांची मान थोडी अधिक लांब असते यांना जीवनामध्ये कधीच सुख मिळत नाही. यांना अनेकवेळा समस्यांचा सामना करावा लागतो. ज्या पुरुषांचा तळहात अधिक खोल असतो असे लोक वडिलांच्या धन सुखाची प्राप्ती करू शकत नाहीत. यांना आपल्याच पैशाने जीवन घालवावे लागते. ज्या पुरुषांचे पोट लांब आणि पातळ असते असे लोक धनाच्या अभावामध्ये राहतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने