शास्त्रामध्ये आवळ्याचा उल्लेख करताना सांगितले गेले आहे कि या झाडाची पूजा केल्याने विष्णूदेव, माता लक्ष्मी, भोलेनाथ प्रसन्न होतात. या झाडावर या तिन्ही देवतांचा निवास असतो. यामुळे धना संबंधी कोणतीही समस्या असल्यास या झाडाची पूजा करणे लाभदायक ठरते.

या झाडाची पूजा करण्याने आर्थिक स्थिती चांगली होते आणि धनाची जीवनामध्ये कधीच कमी जाणवत नाही. आज आपण आवळ्यासंबंधी काही उपाय जाणून घेणार आहोत. जे केल्याने तुम्ही धनवान बनून जाल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.

आवळ्याचे हे उपाय बनवतील धनवान

आवळ्याच्या रसाने करा स्नान: आवळ्याचे ज्युस शरीरासाठी खूपच उत्तम मानले गेले आहे आणि जे लोक हे ज्यूस दररोज पितात ते नेहमी निरोगी राहतात. आवळ्याच्या ज्यूसच्या मदतीने धनवान देखील बनता येते. होय याचा ज्यूस जर शरीरावर लावला किंवा याने स्नान केले तर व्यक्तीच्या जीवनामध्ये धनाची कधीच कमी राहत नाही.

स्नान करण्यापूर्वी स्नान करण्याच्या पाण्यामध्ये थोडासा आवळ्याचा रस मिसळावा. नंतर याने स्नान करावे. असे केल्याने तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी बनून राहील आणि जीवनामध्ये तुम्हाला कधीच धनासंबंधी कोणत्याही समस्या उत्पन्न होणार नाहीत.

आवळ्याच्या रसाने स्नान करण्यासाठी गुरुवार, शुक्रवार आणि एकादशीचे दिवस खूपच उत्तम मानले जातात. यामुळे या तिन्ही दिवसांपैकी एका दिवशी आपण आवळ्याच्या रसाने स्नान करू शकता किंवा याला शरीरावर लावू शकता.

आवळ्याचे दान करा: आवळ्याचे दान करणे खूपच गुणकारी मानले नाते आणि याचे दान केल्याने आपल्याला मनासारखी वस्तू देखील मिळते. याशिवाय धनासंबंधी समस्या देखील हळू हळू दूर होतात. सप्तमीच्या दिवशी आवळ्याचे दान करावे. तुम्ही ११ किंवा २१ आवळे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करू शकता.

आवळा नवमीच्या दिवशी करा पूजा: आवळा नवमीच्या दिवशी या झाडाची पूजा करावी. या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. त्यानंतर आवळ्याच्या झाडाला पूजताना यावर जल अर्पित करावे आणि याची परिक्रमा करावी. त्याचबरोबर या झाडाच्या खाली बसून भोजन देखील करावे.

आवळा नवमीच्या कथेनुसार या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भोलेनाथ, विष्णुदेव आणि माता लक्ष्मीने एकत्र भोजन केले होते. यामुळे आवळा नवमीला झाडाच्या खाली बसून भोजन केल्याने शुभ फळ प्राप्ती होते. तर भोजन करताना जर झाडावरून आवळा खाली पडला तर समजून जा कि तुमची पूजा सफल झाली आहे.

पूजा करण्याशिवाय या दिवशी तुम्ही आवळ्याचे झाड देखील लावू शकता. असे केल्याने देखील माता लक्ष्मीची कृपा बनून राहते आणि धनासंबंधी समस्या दूर होतात. तथापि हि गोष्ट लक्षात ठेवावी कि या दिवशी चुकुनही या झाडाची पाने तोडू नयेत. असे केल्याने पापाचे भागीदार बनतो आणि जीवनामध्ये दुख येण्यास सुरुवात होते.

या दिवशी करा आवळ्याचे सेवन: आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले गेले आहे. तथापि शास्त्रामध्ये काही अशा दिवसांचा उल्लेख केला आहे. ज्या दिवशी आवळ्याचे सेवन करणे वर्जित मानले गेले आहे. जर या दिवशी आवळ्याचे सेवन केले तर व्यक्ती गरीब बनतो.

यामुळे तुम्ही रविवारी, शुक्रवारी, प्रतिपदा, षष्ठी, नवमी, अमावस्या आणि एकादशीच्या दिवशी आवळ्याचे सेवन करू नये. तथापि या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करणे शुभ फळ देते. तर हे होते आवळ्यासंबंधी काही उपाय जे केल्याने आपल्या जीवनामध्ये कधीच धनाची कमी भासणार नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने