तुम्ही दररोज ८ ग्लास पाणी पिता का? जर नाही तर हे सुरु करण्यासाठी चांगली वेळ असेल. पुरेसे पाणी न पिल्याने अनेक दुष्परिणाम होतात. पण हे देखील तितकेच महत्वाचे आहे कि आपण पाण्याचे पर्याप्त प्रमाणात सेवन कसे करतो.
आयुर्वेदामधील सिद्धांत सूचित करतात कि जो प्रकार आपण पाणी पिण्यासाठी निवडतो तो आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम करतो. आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याच्या टिप्स बद्दल अनेक सिद्धांत आहेत ज्यांचे जुन्या काळापासून पालन केले जात आहे.
आपल्या शरीरामध्ये पाणी प्लाज्मा, साइटोप्लाज्म, सीरम, लाळ, नाक स्राव, मस्तिष्कमेरु द्रव, मूत्र आणि घामाच्या रुपामध्ये असते. यामुळे पोषक तत्व शोषून घेण्यासाठी आणि जीवनाला हेल्दी बनवून ठेवण्यासाठी हे अवश्यक आहे कि आपण हेल्दी प्रकारे पाण्याचे सेवन करावे.
अनेक लोक हा प्रश्न विचारतात कि पाणी पिण्याचा हेल्दी प्रकार कोणता आहे? पाणी पिल्याशिवाय पेशी जागृत होऊ शकत नाहीत. मानवी जीवनासाठी पाणी किती अवश्यक आहे हे तर सर्वांना चांगलेच माहिती आहे पण पाणी पिण्याच्या योग्य प्रकारचा अमल खूप कमी लोक करतात. आपण पाणी पिण्याच्या आयुर्वेदिक प्रकाराबद्दल जाणून घेऊया.
१. उभे राहून नाही तर बसून पाणी पिले पाहिजे: नेहमी उभे राहण्याऐवजी बसून पाणी पिणे चांगला विचार आहे. उभे राहून पाणी पिल्याने आपण शरीरामधील तरल पदार्थांचे संतुलन बाधित करतो आणि यामुळे गाठी तयार झाल्यामुळे सांध्यांमध्ये अधिक मात्रामध्ये तरल पदार्थ जमा होतात. बसून पाणी पिल्याने आपल्या मांसपेशि आणि तंत्रिका तंत्र अधिक आरामामध्ये होते आणि नसांना भोजन आणि इतर तरल पदार्थ सहजपणे पचवण्यास मदत मिळते.
२. एका श्वासामध्ये थंड पाणी पिणे टाळा: एकाच श्वासामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पिणे टाळावे. तर लहान लहान घोट घ्या श्वास घ्या आणि पूर्ण दिवस याची पुनरावृत्ती करा. हे आपल्या भोजनादरम्यान देखील योग्य आहे. शरीरामध्ये तीन दोष असतात. वात, पित्त आणि कफ आणि तुम्ही पाण्याचे सेवन कसे करता. असे मानले जाते कि या दोषांनुसारच असायला हवे.
वात असणारे लोक भोजन केल्यानंतर एक तासानंतर पाणी पिऊ शकतात. हे त्यांच्या भोजनाला चांगल्या प्रकारे पचण्यासाठी मदत करेल. पित्त असणारे लोक भोजनादरम्यान पाण्याचे छोटे छोटे घोट घेऊ शकता जेणेकरून त्यांची पाचन प्रक्रिया लवकर सुरु होईल आणि कफ असणाऱ्या लोकांनी भोजन घेण्याआगोदर पाणी पिले पाहिजे.
३. रूम टेम्परेचरवाले पाणी प्यावे, कोमट अधिकच उत्तम: थंड पाण्यापासून दूरच राहावे जे पाचन प्रक्रिया बाधित करते. थंड पाण्याने शरीराच्या विभिन्न भागांना रक्त पुरवठा अपूर्ण प्रमाणात होतो ज्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते.
योग्य पाणी पिल्याने पाचन आणि चयापचय क्रियेमध्ये मदत मिळते आणि जे वजन कमी करण्यास देखील फायदेशीर ठरते त्याचबरोबर सूज आणि वेदनेमध्ये देखील आराम देते. गरम पाणी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील मदत करते आणि धमन्यांना साफ देखील ठेवते.
४. जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा पाणी प्या: जेव्हा आपल्याला पाण्याची तीव्र गरज असते तेव्हा शरीर आपल्याला संकेत पाठवते. तहान लागण्यानंतर आयुर्वेद फक्त पाणी पिण्यावर जोर देते. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते.
यामुळे समान मात्रामध्ये पाणी पिणे प्रत्येकाला अनुशंसित केले जाऊ शकत नाही. शरीर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचे सेवन अवशोषित करू शकत नाही. यामुळे हे जाणून घेणे जरुरीचे आहे कि आपल्याला शरीर पाण्याच्या आवश्यकतेचे संकेत कधी देते.
५. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपल्या शरीराकडून मिळतात हे संकेत: आपले शरीर आपल्याला हे सांगण्यासाठी संकेत देते कि आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. लघवीचा रंग गडद पिवळा असेल हे निर्जलीकरणचे संकेत देऊ शकते.
तर खूप स्पष्ट आहे कि साधारण पिवळ्या रंगाची लघवी एक हाइड्रेटेड आणि संतृप्त शरीराचे संकेत आहे. कोरडे आणि उललेले ओठ निर्जलित शरीराच्या संकेतांपैकी एक आहे. हे संकेत असल्यास जाणून घ्या कारण हे आरोग्याच्या समस्यांमध्ये बदलू शकते.
६. सकाळी सर्वात पहिला पाणी प्या: आयुर्वेदाचा सल्ला आहे कि सकाळच्या वेळी पाणी पिणे एक आरोग्यदायी सवय आहे ज्याला उषापान म्हणून देखील ओळखले जाते. यामुळे शरीरामधील अनेक आजारांपासून दूर राहिले जाऊ शकते. सकाळी पाणी पिल्याने शरीरामधील सर्व विषाक्त बाहेर पडण्यास मदत मिळते आणि आतड्या स्वच्छ होतात.
७. चांदी आणि तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी प्या: आयुर्वेदाने नेहमी तांबे आणि चांदीच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. पाण्यामध्ये शरीरामधील सर्व तीन दोषांना संतुलित करण्याची क्षमता असते. हे पाणी सकारात्मक रुपाने चार्ज करते. असे मानले जाते कि तांब्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला वाढवण्यासाठी मदत करते.
टीप: सल्ल्यासहित हि सामग्री फक्त सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे योग्य चिकित्सा सल्ल्याचा विकल्प नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Very informative post
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा