तूप म्हंटल्यावर याची पौष्टिकता आपल्या डोळ्यासमोर येते. आपण सर्वजण तुपाला आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानतो. तर तुपाला अनेक गुणांचा खजाना मानले गेले आहे. पण हे खूपच कमी लोकांना माहिती आहे कि याचे नुकसान देखील आहेत. तसे तर प्रत्येक वस्तूचे जितके फायदे असतात तितके नुकसान देखील असतात.

आजच्या काळामध्ये हे देखील ओळखणे खूप कठीण आहे कि आपण जे तूप खरेदी करतो ते किती शुध्द आहे. बाजारामध्ये अनेक प्रकारचे तूप आपल्याला सहज मिळते पण कोणते तूप शुद्ध आहे हे आपल्याला समजत नाही. तुपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते जी आजच्या काळामध्ये मोठी समस्या बनली आहे.

नुकसान

तसे तर तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये तुपाचे सेवन करू नये. यामुळे ग’र्भ’पा’त होऊ शकतो. तर प्रेग्नंसीच्या चार-पाच महिन्यानंतर तूप खूप फायदेशीर ठरते. तूप खाण्यास भारी असते ज्यामुळे कधी जास्त तूप खाल्ले तर अपचन आणि लूज-मोशन मोशनची समस्या होऊ शकते.

सर्दी, खोकला आणि कफ असेल तर तूप खाऊ नये. तुपाने कफ अधिक बनू लागतो. ज्यामुळे खोकला देखील वाढतो. तुपाला कधीच मधासोबत खाऊ नये. हे आपल्यासाठी नुकसानकारक असू शकते. जर कधी आपल्याला वाटले कि आपण तूप जास्त खाल्ले आहे तर थोड्या वेळाने गरम पाणी प्यावे यामुळे आराम मिळेल आणि तूप देखील पचेल.

शुध्द तुपाची अशी करा ओळख

आपल्या हाताच्या उलट्या बाजूवर थोडे तूप घ्या आणि दोन्ही हातानी चांगले रगडा. जर तुपामधून छोटे छोटे दाणे निघाले तर समजून जा कि तुपामध्ये भेसळ आहे. जर दाणे निघाले नाही तर हे शुद्ध तूप आहे. हातावर तूप लावून याचा वास घ्या आणि १५ मिनिटे तसेच सोडा. १५ मिनिटांनी पुन्हा वास घ्या जर तुपाचा वास कायम असेल तर समजा कि तुपामध्ये भेसळ नाही.

एका वाटीमध्ये थोडे तूप घ्या आणि यामध्ये चिमुटभर साखर आणि थोडे हा’इ’ड्रो’क्लो’रि’क अॅ’सि’ड टाका हे मिश्रण चांगले मिक्स करा. यानंतर जर तुपाचा रंग बदलू लागला तर समजा कि यामध्ये भेसळ आहे. तुपामध्ये ४-५ थेंब आयोडीन टाकून चांगले मिक्स करावे. यानंतर तुपाचा रंग निळा होऊ लागल्यास तुपामध्ये भेसळ आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने