आपल्या शरीराचा प्रत्येक भाग कोणत्याना कोणत्या अवयवाशी जोडला गेला आहे. ज्याला रगडल्यास किंवा दाबल्यास त्याचा आपल्या आरोग्यासाठी चमत्कारिक फायदा होतो. आज आपण अशीच एक माहिती जाणून घेणार आहोत ज्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. आपल्या हाताच्या तर्जनी बोटाला अंगठ्याने रगडल्यास त्याचे आपल्या चमत्कारिक फायदे मिळतात. चला तर जाणून घेऊया आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात.

आपल्या हाताचा अंगठा हा आपल्या हृद्य आणि फुफ्फुसांशी सरळ जोडलेला असतो. जेव्हा कधी देखील आपल्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तेव्हा तुम्ही हा उपाय वापरू शकता. यामुळे आपल्याला चांगला आराम मिळतो. अशाप्रकारे आपले बोट रगडल्यास आपल्याला पोटदुखी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांमध्ये देखील आराम मिळतो.

आपल्या हाताचे तर्जनी बोट सरळ आपल्या पोटाशी जोडले गेलेले असते. तेव्हा कधीही जर आपल्याला बद्धकोष्ठता किंवा अतिसार सारखी समस्या झाल्यास आपल्या हाताच्या तर्जनी बोटाला अंगठ्याणे रगडावे. असे केल्यास बद्धकोष्ठता किंवा अतिसार समस्येमध्ये आपल्याला आराम मिळतो.

त्याचबरोबर जर आपल्याला झोप व्यवस्थित येत नसल्याची समस्या असल्यास आपल्या हाताचे मधले बोट अशाप्रकारे रगडावे. असे केल्यास आपल्याला शांत झोप लागेल आणि झोपेची समस्या दूर होईल. त्याचबरोबर हाताचे मधले बोट रगडल्यास आपला थकवा देखील दूर होते आणि आपल्याला ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.

जर तुम्हाला नेहमी डोकेदुखीची समस्या होत असेल किंवा मानदुखीची समस्या असल्यास तर तुम्ही हि समस्या सहजपणे दूर करू शकता. असे करण्यासाठी आपल्या हाताचे अनामिका बोट म्हणजे रिंग फिंगर रगडावे. असे केल्यास आपल्या शरीरामधील रक्तस्त्राव संतुलित होतो आणि त्यामुळे डोकेदुखी आणि मानदुखी देखील सहजपणे दूर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने